मुंबई : तब्बल ४८ वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याचा थरारक शेवट अखेर झाला आहे. १९७७ मध्ये झालेल्या हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात ७१ वर्षीय चंद्रशेखर मधुकर कालेकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे.
जेवणावरून वाद झाला, सहकाऱ्याचा खून केला अन् नंतर आरोपी जीपमध्ये जाऊन झोपला
नेमकं प्रकरण काय आहे?
१९७७ साली मुंबईतील कुलाबा परिसरात कालेकर यांचा एका महिलेशी वाद झाला होता. रागाच्या भरात त्यांनी त्या महिलेला चाकूने वार केले. या प्रकरणी भा. दं. वि. कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांना तेव्हा अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं, मात्र नंतर त्यांनी कोर्टाच्या तारखांना हजेरी लावणं बंद केलं आणि अखेर फरार घोषित करण्यात आलं.
पोलिसांचा ४८ वर्षांचा शोध
कुलाबा पोलिसांनी त्यांचा शोध सर्वत्र सुरू ठेवला — लालबाग, सांताक्रूझ, माहीम, गोरेगाव, बदलापूर अशा ठिकाणी तपास झाला पण ठावठिकाणा लागला नाही. त्या काळात मोबाईल नसल्याने लोकेशन मिळणं अवघड झालं होतं.
निवडणूक आयोग आणि आरटीओच्या डेटातून सुगावा
कुलाबा पोलिसांनी नाव “चंद्रशेखर मधुकर कालेकर” निवडणूक आयोग आणि आरटीओच्या पोर्टलवर शोधलं. त्यातून त्याच नावाचे व्यक्ती रत्नागिरीच्या दापोलीत असल्याचं दिसलं. पोलिसांनी दापोली पोलिसांशी संपर्क साधला आणि वाहन परवान्यावरून त्यांचा फोटो मिळवला. हा फोटो मुंबईतील लालबाग परिसरातील जुन्या रहिवाश्यांना दाखवला असता, त्यांनीच ओळख पटवली — “हो, हेच ते चंद्रशेखर कालेकर.”
अखेर अटक आणि कबुली
कुलाबा आणि दापोली पोलिसांनी मिळून छापा टाकून कालेकरांना त्यांच्या घरी अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही बातमी का चर्चेत आहे?
४८ वर्षांनंतर झालेली अटक, पोलिसांची थरारक तपास मोहीम आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळालेला सुगावा — यामुळे हा प्रकार मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे.
नेरुळमध्ये पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मंजुळा बिल्डिंग परिसरातील नागरिक हैराण
नेरुळ येथील मंजुळा बिल्डिंग परिसरात गेल्या पाच दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सायंकाळी पाणीपुरवठा होत नसल्याने परिसरातील नागरिकांचे हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Pune ACB Action : 5 हजाराची लाच घेणं भोवलं; पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात