Khamenei Death Plan : गद्दारी पडली महागात! इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंड? मोसादसोबत खामेनेईंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
मिळालेल्या वृत्तानुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या कुद्स फोर्सचे प्रमुख इस्माईल कानी २०२० मध्ये त्यांनी हे पद स्वीकारले होते. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. मात्र या दाव्यावर अद्याप इराणकडून कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. वृत्तानुसार, कानी यांच्यावर इस्रायलची गुप्त संस्था मोसादसाठी काम केल्याचा संशय आहे.
अरब माध्यमांमध्ये दावा केला जात आहे की खामेनेई यांच्या लपण्याच्या ठिकाणाची अत्यंत गोपनीय माहिती कानी यांनी मोसादला दिली होती. कुद्स ही फोर्स IRGC अत्यंत महत्वाची शाखा असून परदेशात ही संघटना इराण समर्थक गट तयार करते. या गटाकडे खामेनेई यांच्या गोपनीय ठिकाणांची सर्व माहिती असते.
गेल्या आठवड्यात खामेनेईंच्या निवासस्थानावर इस्रालयने हल्ले केला होता. यानंतर कानी गायब झाले असून त्यांच्यावर संशय वाढला आहे. हल्ल्यात इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. परंतु दावा केला जात आहे की हल्ल्याच्या काही मिनिटे आधीच कानी त्या ठिकाणाहून पळून गेले होते. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील कानी यांच्याबाबत अनेक वेळा अशा अफवा समोर आल्या होता. सध्या त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरत असून त्यांना इराणशी गद्दारी केल्यामुळे मृत्यूदंड देण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.
काही दिवसांपूर्वी देखील इस्रायलच्या मोसाद गुप्तचर संस्थेला इराणमधीलच वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याकडूम खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाची माहिती मिळाली असल्याचा काही रिपोर्टसमध्ये दावा करण्यात आला होता. या अचूक माहितीनंतरच इस्रायलने इराणवर आणि खामेनेईंवर हल्ला केला. तसेच यामध्ये अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA नेही साथ दिली असल्याचे म्हटले जात आहे. अद्याप यावर इराणकडून कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
Ans: इस्माइल कानी हे इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या कुद्स फोर्सचे प्रमुख असून २०२० मध्ये त्यांनी हे पद स्वीकारले होते.
Ans: कानी यांच्यावर खामेनेईंच्या गुप्त ठिकाणांची माहिती मोसादला दिल्याचा आरोप आहे. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादसाठी त्यांनी काम केले असल्याचे म्हटसले जात आहे.






