विक्रोळी विभागात ४५२९ दंडात्मक कारवाया (फोटो- istockphoto/सोशल मिडिया)
मुंबई: या महिन्यापासून म्हणजेच मार्च २०२५ पासून संपूर्ण देशात वाहतूक नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी आणि नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी ते नियम करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी मुंबईत मोठ्या संख्येने होत आहे. एकट्या विक्रोळी वाहतुक विभागात गेल्या २० दिवसांत तब्बल ४ हजार ५२९ दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पूर्व उपनगरात वाहनचालकांकडून वाहतूक नियम तोडण्याचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. नवीन वाहतूक कायद्यानुसार यापुढे नियम मोडणान्यांन मोठा दंड व तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. दारू पिऊन चाहन चालविणाऱ्यांसाठी कडक कारवाई केली जात आहे.
दारू पिऊन गाडी चालवताना आढळला, तर त्याला तब्बल १० हजारांचा दंड आणि ६ महिने तुरुंगवास होऊ शकतो. जर तीच एक चूक पुन्हा केली तर १५ हजार दंड आणि २ वर्षांचा तुरुंगवास होणार आहे. ही कारवाई काही प्रमाणात जुनी असली तरी काही नियम बदलले आहेत. विक्रोळी वाहतूक विभागात १ मार्चपासून करण्यात आलेल्या कारवाईत ९८२ भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर, ७८४ व्हेवी मोटार क्लिनर नसलेली, ६९१ सिग्नाल तोडणे, ५०२ नो एंट्री, ४४९ साईनबोर्ड, ३४५ पोलीस स्टॉप, २५३ जास्त प्रवासी घेणे, २३९ विनापरवाना स्टिकर २१७ विना सीटबेल्ट, २१२ विना हेल्मेट, १५३ पोलीस ऑर्डर न मानणे, १३२ पोलीस इशारा न मानणे, १०९ वाहन परवाना न दाखवणे १०२, चाहन पीयूसी नसणे याप्रकारच्या दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत अशी माहिती विक्रोळी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक लांडगे यांनी दिली. विशेष महणजे घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरातील भीलयोग मॉल समोरच्या चौकात रात्रीच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. रिक्षाचालकांची मनमानी होत होती. मात्र वाहतूक पोलिसांनी कडक दंडात्मक कारवाई करून त्यांना वठणीवर आणले आहे.
नियम मोडल्यास वाहनचालकांना दंड
दरम्यान, नवीन वाहतूक नियमानुसार विना हेल्मेट आणि सीट बेल्टसाठी मोठा दंड आकारण्यात येत आहे. तर वाहतूक नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांसाठीही मोठ्या कारवाया करण्यात येणार आहेत. आता बिना हेल्मेट बाइक बालवल्यास १ हजार दंड आणि ३ महिने ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाणार आहे. तर कारमधील प्रवाशांनी सीट बेल्ट न लावल्यास १ हजार दंड आकारला जाणार आहे. इथेच नाहीतर वाहन चालवताना मोबाईल वापरला तर तब्बल हजार रुपये दंड आकारला जात आहे.
पीयूसीसाठी
कडक नियम प्रदूषण नियंत्रण सर्टिफिकेट नसल्यास अता वाहनांना १० हजार रुपयांना दंड आणि ६ महिने तुरुंगवास होणार आहे. रस द्वायटिंग, ट्रियल रायडिंगवर कठोर कारवाई केली जाईल. दुचाकीवर तीन प्रवासी असतील तर १ हजार रुपयांवा दंड भरावा लागेल. वेगाने गाडी वालवणे किवा रेलिंग केल्यास ५ हजार इतका दंड आहे.
रुग्णवाहिकेबाबत नवीन नियम
रुग्णवाहिकेला वाट न दिल्यास १० हजारांचा दंड तर सिग्नल तोहल्यास आणि ओवरलोडिंग केल्यास मोठा दंड आवप्रस्न सिग्नल तोडल्यास ५ रुपये दंड आणि ओव्हरलोडिंग वहनासाठी २० हजारांचा दंड आकारला जाणार आहे.
अल्पवयीन वाहनचालक
कोणीही अल्पवयीन वाहनचालक पकडल्यास पालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याच्या पालकांवर २५ हजार रुपयांचा दंड, ३ वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा आणि वाहनाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल. तर संबंधित अल्पवयीन बालक २५ वर्षांचा होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकणार नाही असा नवीन नियम करण्यात आला आहे.