Satara Crime: साताऱ्यात भीषण दुर्घटना! आयशर टेम्पो धरणाकडे पलटून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, LSD हे अत्यंत धोकादायक ड्रग्स असून ते प्रामुख्याने कागदाच्या छोट्या तुकड्यांच्या स्वरूपात विकले जाते. हे ड्रग्स ओळखणे अत्यंत कठीण असते. अल्प प्रमाणात घेतले तरी त्याचा थेट परिणाम मानवी मेंदूवर होतो. यामुळे व्यक्तीची मानसिक स्थिती बिघडू शकते तसेच गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
पोलिसांच्या तपासात शहरातील काही उच्चभ्रू भागांमध्ये तसेच तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये या ड्रग्सचा वापर वाढत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सोशल मीडिया आणि गुप्त नेटवर्कच्या माध्यमातून या ड्रग्सची विक्री होत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी पथकाने या संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू केला आहे.
डॉ. सिंघल यांनी पालकांना विशेष आवाहन करताना सांगितले की, मुलांच्या वागणुकीत अचानक बदल, अभ्यासाकडे दुर्लक्ष, चिडचिडेपणा किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ सतर्क व्हावे. नागपूरला ड्रग्जमुक्त करण्यासाठी नागरिकांनी आणि पालकांनी पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या कारवाईनंतर शहरातील अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, लवकरच आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
Sangli Crime: सांगली हादरली! दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराचे अपहरण करून निर्घृण खून






