काय घडलं नेमकं?
सकाळी ८ वाजताच्या सुमारास शेतमालक किसन लाभे हे नेहमीप्रमाणे शेतात गेले असता गुरांच्या गोठ्याजवळ ओढणी व चपला बेवारस अवस्थेत दिसून आल्या. संशय आल्याने परिसरात शोध घेतला असता शेतातील विहिरीत एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. यानंतर तातडीने गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी कृष्णा प्रधान, प्रसाद सालकाडे आणि प्रमोद पिसे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेची वार्ता गावात पसरताच विहिरीजवळ नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. देवलाबाई यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार असून त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Satara Crime: साताऱ्यात भीषण दुर्घटना! आयशर टेम्पो धरणाकडे पलटून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
चंद्रपुरात थरारक खून! २२ वर्षीय तरुणाने केली प्रेयसीची हत्या; आधी केला आत्महत्येचा बनाव मात्र…
चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या २९ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या केल्यांनतर आरोपीने या प्रकरणाला आत्महत्येचे रूप देण्याचा प्रयत्न केला होता. जेणेकरून तो कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकेल. मात्र २० दिवसांनी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालाने या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि पोलिसांच्या तपासाला एक नवी दिशा मिळाली. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Sangli Crime: सांगली हादरली! दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराचे अपहरण करून निर्घृण खून
Ans: देवलाबाई रमेश गजभे असे मृत महिलेचे नाव होते.
Ans: चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी गावात ही घटना घडली.
Ans: शेतातील विहिरीत मृतदेह आढळला.






