नागपूर: नागपूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीचा एका पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचे राग मनात धरत पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने फावड्याने डोक्यात वार करून हत्या केली. त्यानंतर त्याने पत्नीला रुग्णालयात दाखल करण्याचं नाटक देखील केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत महिलेचं नाव रिंकी किशोर प्रधान (23) आणि आरोपी पती किशोर शंकर प्रधान (31) अशी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर गॅरेजमध्ये काम करतो आणि मजदूरी देखील करतो.
नेमकं काय आहे प्रकरण?
किशोर आणि रिंकी यांचं ५ वर्षांपूर्वी निधन झालं होत. या दाम्पत्याला अपत्य नव्हतं. याच दरम्यान, रिंकी हिचं नाव करण नावाच्या एका पुरुषासोबत जोडण्यात आलं. करण आणि रिंकीच्या घरी देखील येणं आणि जाणं सुरु होत. याची माहिती किशोर याला शेजारच्यांनी दिली. तेव्हापासून दोघांमध्ये वाद सुरु झाले. किशोर याने रिंकीला समजावलं देखील परंतु रिंकी आणि करण यांचं बोलणं सुरु होत.
अहमदाबादला गेली होती पळून
रिंकीने व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलिंग आणि चॅटिंग सुरू केलं. किशोरने तेव्हाही तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण दोघांमध्ये जोरदार वाद झाला. पंचवीस दिवसांपूर्वी, रिंकी तिचा प्रियकर करणसोबत अहमदाबादला पळून गेल्याची माहिती देखील समोर येत आहे. अशात किशोरने नातेवाईकांची मदत घेतली आणि रिंकी नऊ दिवसांनी घरी परतली.
मात्र काही दिवसांनी बोलण्यास सुरवात
रिंकी घरी परतल्यानंतर करण आणि रिंकीला समजावून सांगण्यात आलं. रिंकीने याप्रकरणी माफी देखील मागितली. काही दिवस सर्वकाही सुरळीत सुरु असतांना रिंकी हिने पुन्हा करण याच्यासोबत बोलण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये पुन्हा चॅट आणि व्हिडीओ कॉल सुरु झाले. रविवारी दुपारी किशोर घरी आल्यानंतर रिंकी ही बॉयफ्रेंड सोबत बोलत असल्याचं त्याला समजलं. संतापलेल्या किशोरने घरातून एक फावडा उचलला आणि रिंकीच्या डोक्यावर वार केला.
तीच रक्त वाहू लागलं आणि जागीच ती बेशुद्ध पडली.
रुग्णालयात केले दाखल…
त्याने शेजारच्यांच्या मदतीने रिंकीला रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केला. डॉक्टरांना संशय आल्यामुळे पोलीस चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलीस चौकशी करण्यासाठी किशोरच्या घरी पोहोचले तेव्हा पोलिसांना सत्य कळलं. किशोरने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आता या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
Delhi Crime: लेफ्टनंट असल्याचं सांगून डॉक्टरला फसवलं, लग्नाचं आमिष देत नशा देऊन केले अत्याचार






