सौजन्य फोटो - सोशल मिडीया
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश पावरा हे आपल्या पत्नी आणि लहान मुलासह दुचाकीवरून शहादा तालुक्यातील चांदसैली येथील आपल्या गावी जात होते. सुट्टीचा दिवस असल्याने कुटुंबासोबत आनंदाने गावी निघालेल्या पावरा कुटुंबावर सावखेड गावाजवळ अचानक काळाने घाला घातला.
मध्य प्रदेशमधून गुजरातच्या दिशेने जात असलेल्या या रुग्णवाहिकेने पावरा यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यातील चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर मुकेश पावरा आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले असून, त्या दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर तेथे मोठी गर्दी जमली. धक्कादायक बाब म्हणजे, या रुग्णवाहिकेत एकही रुग्ण नव्हता. त्यामुळे संबंधित रुग्णवाहिकेचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून जबाबदार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Ans: मुकेश पावरा हे पत्नी आणि लहान मुलासह दुचाकीवरून चांदसैली गावी जात असताना मध्य प्रदेशहून गुजरातकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
Ans: या अपघातात पावरा दाम्पत्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला, तर मुकेश पावरा आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Ans: रुग्णवाहिकेत एकही रुग्ण नसताना हा अपघात घडल्याने चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.






