
crime (फोटो सौजन्य: social media)
Pune Crime: CET निकालानंतर मानसिक तणाव, विद्यार्थिनीने राहत्या घरी संपवलं जीवन; पुण्यातील घटना
काय घडलं नेमकं?
गुलाब केशव निकम (वय 59) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा उदरनिर्वाह तीन एकर सशेतीवर चालत होते. शेतीतून चांगलं उत्पन्न मिळेल या आशेने त्यांनी कर्ज घेतले होते, मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. एकीकडे पिकाचे झालेले नुकसान आणि दुसरीकडे बाजारपेठेत कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने निकम यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला. यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक विवंचनेत होते. याच नैराश्यातून त्यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरु केली आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति क्विंटल 3 हजार रुपये हमीभाव द्या, कांद्याला किमान 1500 रुपये अनुदान द्या, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करीत आहे.
नाशिकमध्ये जमीन वादातून थरार! दोन महिलांना ट्रॅक्टरखाली चिरडल्याचा आरोप
नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या वादातून दोन महिलांना ट्रॅक्टर खाली चिरडल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. वादग्रस्त जमिनीवर नांगरणी सुरू असताना आणि न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना शेतात दोनही बाजूंमध्ये वाद झाला. जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलांना ट्रॅक्टरची धडक बसल्याचे आरोप करण्यात येत आहे. घडलेली घटना नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये घडली.
या प्रकरणातील जखमी झालेल्या महिलांची नावे रश्मी अजय गोसावी आणि सुवर्णा सुभाष गोसावी असे आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात भावबंदकीच्या जमीन वादातून ही घटना घडली. न्यायालयाने स्थगिती दिलेल्या जमिनीवर जबरदस्तीने शेती नांगरण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी याला महिलांनी विरोध केला तेव्हा त्यांच्यात वाद झाला. तेव्हा महिलांसह कुटुंबीयांना ट्रॅक्टर खाली शिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेत दोन महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Nashik Crime: नाशिकमध्ये जमीन वादातून थरार! दोन महिलांना ट्रॅक्टरखाली चिरडल्याचा आरोप
Ans: गुलाब केशव निकम असे मृत शेतकऱ्याचे नाव होते.
Ans: कांद्याला कमी भाव, पिकांचे नुकसान आणि कर्जबाजारीपणा ही प्रमुख कारणे होती.
Ans: कांद्याला प्रति क्विंटल 3 हजार रुपये हमीभाव आणि 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी केली.