scam (फोटो सौजन्य - pinterest)
मुंबईच्या डोंबोलीतुन एक मोठा घोटाळा समोर आलं आहे. शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा देतो असं म्हणत तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.
लाचेची रक्कम घेऊन महिला पोलिसाने ठोकली धूम; एसीबीने पाठलाग करून पकडलं
नेमकं काय आहे प्रकरण?
डोंबिवली पश्चिम येथील उमेशनगर येथील सेवानिवृत्त बँक कर्मचारी मोहन सावंत यांच्या मुलीच्या वर्गमित्र अनिकेत मुजुमदार याने त्यांची ओळख संदेश जोशीशी करून दिली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा 10 टक्के परतावा मिळतो, असे सांगून दोघांनी मिळून ‘ग्रोथअप इंडिया’ आणि ‘अर्थयुक्ती कन्सल्टिंग’ याक्लासेसचा विश्वास केला.
मोहन सावंत यांनी यात 10 लाख रुपये गुंतवले. त्यावर त्यांना 1.30 लाख रुपये परत मिळाले, उर्वरित रक्कम आणि परतावा देण्यात आला नाही. त्यानंतर पैसे मागितल्यावर आरोपींनी त्यांना धमकावले. पोलिसांमध्ये ओळख असल्याचे सांगत तक्रार करू नये, असा इशारा त्यांनी दिला. यानंतर मोहन सावंत यांनी या कंपनीची चौकशी केली असता त्याने अशाचप्रकारे आठ ते नऊ गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची माहिती मिळाली. यानंतर सावंत यांनी सर्वच गुंतवणूकदारांना आपल्यासोबत घेत डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
अशी करत होते फसवणूक
डोंबिवलीतील ग्रोथअप इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टिंग या क्लासेसच्या माध्यमातून आधी विद्यार्थ्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे क्लासेस घेतले जायचे. त्यानंतर त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे विश्वास संपादन करण्यात यायचे. त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जायची.
करोडो रुपयांची फसवणूक
या तक्रारीत गुंतवणूकदारांमध्ये अजित तोडकर, अमित गुप्ता, दिलीप बांभनिया, निकिता गाला, प्रणव जोशी, सुशमा साळवी, संकेत तळेकर आणि तान्हाजी पिचड यांचा समावेश आहे. या सर्वांची एकत्रित 1.23 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकरणात शेकडो लोकांची फसवणूक करत करोडो रुपयाची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरोपी अटकेत
या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी 8 ते 9 जणांच्या तक्रारीवरुन विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे.पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला कडक कारवाई करावी, अशी मागणी गुंतवणूकदारांकडून करण्यात येत आहे. पोलिसांच्या मते या फसवणुकीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची शक्यता आहे.
नागरिकांनी अशाप्रकारचे शेअर मार्केटिंग, डिजिटल अरेस्ट, जास्त पैसे देण्याच्या आमिषाला बळी पडू नये. तसेच अशाप्रकारे कोणी करत असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून केले.
बारामतीत युवकाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल; आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या