श्रद्धाच्या वडिलांचा बांध फुटला
मुंबई- श्रद्धा वालकर या २७ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर सगळा देश हादरला होता. तिच्या कुटुंबीयांनाही हा मोठा धक्का होता. पहिल्यांदाच श्रद्धाच्या वडिलांच्या संतापाचा बांध फुटलाय. एका टीव्ही चॅनेललला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांचा आफताबवरचा संताप व्यक्त केलाय. आफताब आपल्या मुलीचे इतके तुकडे करु शकतो यावर विश्वास बसत नसल्याचं ते म्हणालेत. श्रद्धा हत्येनंतर आफताबनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, तो पोलिसांच्या प्रश्नांना नीटपणे उत्तरंही देत नव्हता, असंही श्रद्धाच्या वडिलांनी सांगितलंय.
श्रद्धाला म्हणजेच आपल्या मुलीचा समजावण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तरीही तिनं ऐकलं नाही, याची खंत श्रद्धाच्या वडिलांनी बोलून दाखवली. इतकंच नाही तर ज्या नराधम आफताबनं आपल्या मुलीचं ३५ तुकडे केले, त्याचे आता ७० तुकडे करायला हवेत, अशी संतप्त भावनाही त्यांनी व्यक्त केलीय. महरौलीच्या जंगलात सापडलेल्या हाडांचे डीएन हे श्रद्धाच्या वडिलांशी जुळले असल्यानं आफताबच्या विरोधात मोठा पुरावा दिल्ली पोलिसांच्या हाती लागला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आफताबला बाहेरुन कुणाचातरी पाठिंबा असल्याचा संशयही श्रद्धाच्या वडिलांनी व्यक्त केलाय. श्रद्धाला जर खरंच न्याय द्यायचा असेल तर आफताबसारखअया नराधमाच्या शरिराचे ७० तुकडे करण्याची गरज असल्याचंही ते म्हणालेत. असं कृत्य केलं तर काय शिक्षा मिळू शकते, याचं हे प्रकरण उदाहरण ठरावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलीय. आफताब दिशाभूल करत होता, आता मात्र पोलिसांच्या हाती पुरावे लागले आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरणं चालावं आणि आफताबला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हाही, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केलीय.
श्रद्धाचा भाऊही या प्रकरणात प्रचंड दु:खी असल्याचं त्यांनी सांगतिलंय. त्याचं अभ्यासातलं लक्ष उडालं आहे, असंही ते म्हणाले. श्रद्धाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिनं ऐैकलं नाही, असं सांगताना ते भाऊक झाले. समाज आता मुलीला समजावण्यात आपण अपयशी ठरल्याचं मानत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. आमच्या घराण्यात यापूर्वी कधी प्रसंग आला नसल्याचं ते म्हणाले. समाज या सगळ्यासाठी आपल्यालाच दोषी धरतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केलीय.
कुटुंबापासून दूर होण्यासाठी आफताबनं श्रद्धावर दबाव टाकल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली. सुरुवातीपासून आफताबचे यामागे प्लॅनिंग असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केलाय. आफताबच्या कुटुंबीयांनी जरी पूर्वकल्पना दिली असती तर मुलीला वाचवता आलं असंत असंही श्रद्धाचे वडील म्हणालेत. आफताबशी मैत्री झाल्यानंतर श्रद्धा प्रॉपर्टीविषयी विचारत होती, त्यातूनच आफताब तिला कुठल्या मार्गावर घेऊन चाललाय हे दिसत होतं. असंही ते म्हणालेत.






