Shraddha Walkar Murder Case
कोर्टाने आरोपीचा याचिका स्वीकारली
या प्रकरणाची सुनावणी करणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश (एएसजे) हरगुरविंदर सिंग जग्गी यांनी, आरोपीने दाखल केलेल्या याचिकेवर विचार करत २० जुलैची नियोजित सुनावणी रद्द केली. न्यायालयाने यावेळी नमूद केले की, आरोपीची एमएची परिक्षा असल्याकारणाने त्या दिवशी कायदेशीर कार्यवाही करणे शक्य होणार नाही.
तिहार जेलमध्ये आफताब देणार परिक्षा
आफताब अमीन पूनावाला सध्या श्रद्धा वालकर हत्याप्रकरणात दिल्लीच्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची एमएची परिक्षा तिहार तुरुंग परिसरातील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) परीक्षा केंद्रावर होणार आहे.
Beed Crime: बीडमध्ये मध्यरात्री थरार! किरकोळ वादातून 21 वर्षीय तरुणाचा चाकूने निर्घृण खून
२०२२ मधील चर्चेत हत्याकांडाचा आरोप
आफताब अमीन पूनावाला याच्यावर गर्लफ्रेंड श्रद्धा वालकरच्या हत्येचा आरोप आहे. दिल्लीतील छत्तरपूर येथे श्रद्धाची हत्या करण्यात आली आणि नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करत त्यांना दिल्लीच्या वेगवेगळ्या जंगलात फेकून दिले. वडिलांनी बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आणि पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी आफताबला अटक केली. या प्रकरणी साकेत न्यायालयात सुनावणी सुरु आहे.






