• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • One Person Has Died In A Shooting Incident In Kamshet

कामशेतमध्ये टोळक्याचा वाहनचालकावर हल्ला; स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू

इंद्रायणी ढाब्याजवळ आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने वाहनचालकावर कोयते आणि दांडक्यांनी हल्ला केला आहे. जीव वाचवण्यासाठी वाहनचालकाने स्वसंरक्षणार्थ चालवलेल्या गोळीबारात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 04, 2025 | 04:55 PM
कामशेतमध्ये टोळक्याचा वाहनचालकावर हल्ला; स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कामशेतमध्ये टोळक्याचा वाहनचालकावर हल्ला
  • स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू
  • तीन जण जखमी
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी घटना समोर आली आहे. कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्दीत पैशांच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादाने बुधवारी (३ डिसेंबर) रात्री भीषण रूप धारण केले. इंद्रायणी ढाब्याजवळ आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने वाहनचालकावर कोयते आणि दांडक्यांनी हल्ला केला आहे. जीव वाचवण्यासाठी वाहनचालकाने स्वसंरक्षणार्थ चालवलेल्या गोळीबारात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत.

मृत युवकाचे नाव रोहित मदन कुर्मा (२५, रा. रामनगर, पिंपरी) असे आहे. फिर्यादी अशोककुमार मुनेश्वर सिंग (६०, रा. तापकीरमळ चौक, पिंपरी) हे एका व्यावसायिकाचे वाहन चालक आहेत. त्यांचे वाहनमालक हरीश सिंग आणि आकाश उर्फ बंटी राजपूत (२३, रा. रामनगर, देहूरोड) यांच्यात काही दिवसांपासून पैशांच्या देवाण-घेवाणीवरून वाद सुरू होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री आकाश राजपूत आणि त्याच्या साथीदारांनी अशोककुमार यांना मुंढावरे गावाजवळ अडवले, शिवीगाळ करत ‘व्यवहाराचे पैसे दिले नाहीत तर संपवतो’ अशी धमकी देत कारवर कोयते-दांडक्यांनी हल्ला केला. त्यानंतर त्यांना खाली ओढून मारहाण करण्यात आली.

जिवावर आलेली वेळ ओळखून अशोककुमार यांनी स्वसंरक्षणार्थ टोळक्यांच्या दिशेने गोळीबार केला. यात रोहित कुर्मा यांच्या डोक्यात गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान अशोककुमार आणि हल्लेखोर गटातील आणखी दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोणपे, कामशेत पोलिस निरीक्षक शंकर पाटील व गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, पाच ते सहा आरोपी फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या असून, संपूर्ण घटनेचा तपास कामशेत पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: One person has died in a shooting incident in kamshet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 04:55 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Death

संबंधित बातम्या

धक्कादायक ! नगरसेवकाच्या वाहनचालकाचे फिल्मी स्टाईल अपहरण; तोंड दाबून गाडीत कोंबलं अन् नंतर…
1

धक्कादायक ! नगरसेवकाच्या वाहनचालकाचे फिल्मी स्टाईल अपहरण; तोंड दाबून गाडीत कोंबलं अन् नंतर…

फक्त मौजमजेसाठी ‘ते’ चोरायचे दुचाकी; चोरट्यांकडून 20 गाड्या जप्त, पोलिस तपासात…
2

फक्त मौजमजेसाठी ‘ते’ चोरायचे दुचाकी; चोरट्यांकडून 20 गाड्या जप्त, पोलिस तपासात…

क्रूरतेला सीमा नाही! अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मनोरूग्ण महिलेला थेट…
3

क्रूरतेला सीमा नाही! अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मनोरूग्ण महिलेला थेट…

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले
4

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vastu Tips: स्वयंपाकघरात ठेवलेल्या या गोष्टीमुळे वाढू शकते नकारात्मक ऊर्जा, घरात येऊ शकते दरिद्रता

Vastu Tips: स्वयंपाकघरात ठेवलेल्या या गोष्टीमुळे वाढू शकते नकारात्मक ऊर्जा, घरात येऊ शकते दरिद्रता

Mar 07, 2026 | 11:30 AM
Mumbra Firing: मुंब्रामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार; एक आरोपी अटकेत

Mumbra Firing: मुंब्रामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार; एक आरोपी अटकेत

Mar 07, 2026 | 11:26 AM
युनिक लुक आणि पॉवरफुल फीचर्स! लाँच होताच सुरु झाली Nubia स्मार्टफोनची चर्चा, 80W चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

युनिक लुक आणि पॉवरफुल फीचर्स! लाँच होताच सुरु झाली Nubia स्मार्टफोनची चर्चा, 80W चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

Mar 07, 2026 | 11:25 AM
‘अमेरिका मुर्दाबाद’! खामेनेईंच्या समर्थनार्थ पाकिस्तानात गदारोळ; शिया मुस्लिमांवर लष्कराच्या गोळीबारामुळे पेटला हिंसाचार

‘अमेरिका मुर्दाबाद’! खामेनेईंच्या समर्थनार्थ पाकिस्तानात गदारोळ; शिया मुस्लिमांवर लष्कराच्या गोळीबारामुळे पेटला हिंसाचार

Mar 07, 2026 | 11:25 AM
आता पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर नजर; मुंबई पोलिसांना मिळणार अमेरिकन स्टाईल बॉडी-वॉर्न कॅमेरे

आता पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर नजर; मुंबई पोलिसांना मिळणार अमेरिकन स्टाईल बॉडी-वॉर्न कॅमेरे

Mar 07, 2026 | 11:15 AM
Ind Vs NZ : विश्वविजेत्याला संघावर होणार पैशांचा पाऊस! जाणून घ्या T20 विश्वचषकात कोणत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळणार?

Ind Vs NZ : विश्वविजेत्याला संघावर होणार पैशांचा पाऊस! जाणून घ्या T20 विश्वचषकात कोणत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळणार?

Mar 07, 2026 | 11:09 AM
Obesity: लठ्ठपणामुळे वाढतो अनेक आजारांचा धोका, केवळ वजनवाढ नाही; जीवावर बेतू शकते दुर्लक्ष करणे

Obesity: लठ्ठपणामुळे वाढतो अनेक आजारांचा धोका, केवळ वजनवाढ नाही; जीवावर बेतू शकते दुर्लक्ष करणे

Mar 07, 2026 | 11:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.