कसा झाला मृत्यू?
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे सुरेश लाड आणि निखिल लाड यांच्या मालकीच्या शेतात लोंढे दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून सालगडी म्हणून राहत होते. रोजच्या प्रमाणे ते सोमवारीही दोघे शेतातील कामात गुंतले होते. तेव्हाच त्यांचा पाच वर्षांचा लहान मुलगा प्रज्वल हा शेततळ्याच्या दिशेने गेला. शेततळ्याच्या कडेला शेवाळ साचली होती. त्यामुळे तो घसरून पाण्यात पडला. हे आई- वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी देखील ततातडीने पाण्यात उडी मारली. मात्र तळ्यातील घसरडी पृष्ठभाग, कडेला असलेली साचलेली गळ आणि खोल पाणी यामुळे ती स्वतःच अडचणीत सापडू लागली.
पत्नी आणि मुलगी दोघेही पाण्यात झुंजत असल्याचे पाहताच विजय लोंढे यांनीही तळ्यात उडी घेतली. परंतु परिस्थिती अनुकूल नसल्याने आणि तिघेही एकमेकांना धरून असल्याने ते पाण्यावर तरंगू शकले नाहीत. काही क्षणांत तिघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली असल्याचे सांगितले जाते. त्या वेळी शेत परिसर ओसाड असल्याने कोणीही तातडीने मदतीला धावून येऊ शकले नाही.
गावात शोककळा
पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पंढरपूर तालुका पोलीस घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह बाहेर काढले. प्राथमिक तपासानुसार ही दुर्घटना अपघाती असल्याची पोलिसांनी समजले आहे. लोंढे कुटुंब हे मूळचे मंगळवेढा तालुक्यातील असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते पंढरपूर तालुक्यातील या शेतात राहून काम करत होते. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे कुटुंबाला योग्य मदत देण्याची मागणी केली आहे.
Ans: खेळताना मुलगा तळ्यात पडला. आई त्याला वाचवण्यासाठी उतरली, नंतर वडिलांनी उडी घेतली. तिघेही पाण्यात अडकून मृत्यूमुखी पडले.
Ans: मोठा मुलगा शाळेत असल्याने घटनेवेळी उपस्थित नव्हता आणि तो वाचला.
Ans: पोलिस तपासानुसार घटना अपघाती स्वरूपाची असल्याचे मानले जात आहे.






