Photo Credit- Social Media मूल होत नसल्याने मात्रिंकाकडे गेलल्या २० वर्षीय विवाहितेचे शारीरिक शोषण
अमरावती: पुरोगामी अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून ग्रहण लागले की काय अशीच परिस्थिती दिसत आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळापासून अगदी सर्वसामान्य माणूसही या ग्रहणात अडकला आहे. जादूटोणा, अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील सर्वात पहिले राज्य आहे. पण आजही आपल्या समस्या सोडवण्यासाठी लोक मांत्रिकाकडे जाऊन आपली फसवणूक करून घेत असल्याच्या घटना राज्यभरातून समोर येत आहेत. अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यातून समोर आली आहे.
अमरावतीत एका विवाहित महिलेवर मांत्रिकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपत्यप्राप्तीसाठी उपचाराच्या उद्देशाने पीडित महिला मांत्रिकाकडे गेली असता, त्याने तिचा गैरफायदा घेतला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मुंबईतील आर्थर रोड जेल ‘ओव्हरफ्लो’; 50 कैद्यांच्या बराकमध्ये 200 ते 250 कैदी
प्राप्त माहितीनुसार, २० वर्षीय विवाहित महिला मूल होण्यासाठी उपाय शोधत मांत्रिकाकडे गेली होती. मात्र, मांत्रिकाने तिच्यावर जबरदस्ती केली. ही घटना अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मांत्रिकाने मंत्र उच्चारण्याच्या बहाण्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित मांत्रिकाविरोधात बलात्कार आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव दिगंबर रतन चव्हाण असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचा एप्रिल २०२४ मध्ये विवाह झाला होता. मात्र, तिला गर्भधारणेतील अडचणी येत होत्या व तिन्ही वेळा गर्भपात झाला होता. सततच्या पोटदुखी व सूज यामुळे अनेक उपचार करूनही समाधानकारक परिणाम मिळत नव्हते.
याचदरम्यान, दिगंबर रतन चव्हाण नावाच्या मांत्रिकाने ५ फेब्रुवारी रोजी पीडितेच्या घरी येऊन तिचा हात पाहिला आणि लिंबाच्या साहाय्याने बाहेरून काही शक्ती तिच्यामागे असल्याचा दावा केला. त्याने पीडितेच्या शरीरावर लिंबू फिरवले, तिच्या कमरेसह हात-पायांवर पंचरंगी दोरा बांधला आणि ताबीज दिले.
धक्कादायक ! पतीच्या आत्महत्येने पत्नी निराश; मुलीसह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या
७ फेब्रुवारी रोजी रात्री अचानक पीडितेच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. याबाबत सासऱ्यांनी दिगंबर चव्हाणला माहिती दिली. त्याने ८ फेब्रुवारीला तिला आपल्या घरी आणण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे, पीडिता आपल्या सासऱ्यासोबत कमलपुष्प कॉलनीतील त्याच्या घरी गेली. तिथे त्याने तिला एका खोलीत नेले, लिंबूचे उपचार करण्याचे नाटक करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि कुणाला काही सांगितल्यास जादूटोण्याद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली.
घाबरलेल्या पीडितेने ही संपूर्ण घटना आपल्या सासऱ्याला सांगितली आणि गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी दिगंबर चव्हाणविरुद्ध बलात्काराचा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.