संभाजीनगरमध्ये ग्रामसेविकेवर अत्याचार; विविध ठिकाणी नेत अश्लील व्हिडिओ, फोटही काढले (फोटो सौजन्य: iStock)
अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे लैंगिक शोषण केले आणि त्यानंतर तिला लग्नास नकार दिला. या घटनेची तक्रार पीडित तरुणीने मंगळवारी (दि. 8) राजापेठ पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी सूरज संतोषराव बाहे (वय 32, रा. गोंडबाबा मंदिरामागे, अमरावती) याच्याविरुध्द गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, शहरातील एक तरुणी सुरजला बारा वर्षांपासून ओळखते. त्यांचे प्रेमसुत जुळले. त्यावेळी सुरजने तरुणीला आपल्याला लग्न करायचे आहे, असे सांगितले होते. त्यानंतर ते एकमेकांसोबत फोनवर बोलत होते. दरम्यान, सुरजने तरुणीला घर दाखविण्याचा बहाणा करून गोंडबाबा मंदिरामागील परिसरातील घरी नेले. बेडरूममध्ये नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर सुरजने 27 फेब्रुवारी रोजी आपला वाढदिवस तरुणीच्या घरी जाऊन साजरा केला. त्यावेळी त्याने पुन्हा तरुणीसोबत तिच्या समंतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. परंतु, त्यानंतर तरुणी सुरजला लग्नाबद्दल विचारत असताना, तो टाळाटाळ करू लागला.
दरम्यान, 1 एप्रिल रोजी तरुणी सुरजच्या ऑफिसमध्ये गेली आणि तिने त्याला लग्नाबद्दल विचारणा केली. त्यावेळी त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला आणि ‘तुला जे करायचे आहे, ते करून घे’, अशी धमकी दिली. त्यामुळे पीडित तरुणीने मंगळवारी राजापेठ पोलिस ठाणे गाठून सुरजविरुध्द तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
आयसीयूत तरूणीसोबत पोलिसाचे गैरवर्तन
आता कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूरात एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या १५ वर्षाच्या मुलीचा जबाब घेण्यासाठी गेलेल्या पोलीस चेतन दिलीप घाटगेने तिच्याशी गैरवर्तन केल्याचे समोर आले. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.
परदेशी महिलेवर सामूहिक अत्याचार
पुण्यात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भूतानमधून पुण्यात शिक्षण आणि नोकरीसाठी आलेल्या २७ वर्षीय परदेशी महिलेवर सात जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही महिला २०२० पासून पुण्यात वास्तव्यास होती. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी शंतनु कुकडे आणि त्याचे सहा साथीदार आरोपी असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.