अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचा संप तूर्त मागे; शासनाने उचललं 'हे' महत्त्वाचं पाऊल (File Photo : Truck)
वर्धा : दिल्लीहून मुंबई येथे कंटेनरमधून जोडे आणि इलेक्ट्रीक साहित्याच्या आडून प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची सुरू असलेली तस्करी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळली. सिंदी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेलेल्या समृद्धी महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. यात चालकासह एकाला पोलिसांनी अटक केली असून, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेदेखील वाचा : Mumbai Crime: बेरोजगारीपोटी चोरी करायला शिरला फ्लॅटमध्ये, सुटला स्वतःवरचा ताबा मौल्यवान वस्तूऐवजी घेतले महिलेचे चुंबन आणि मग…
शाहीद ईलीयास (वय ३२), हाकमखॉन शाकिरखॉन (वय २२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. छार दीपक छाबडा (रा. दिल्ली), कंटेनर मालक अशिना विकास छाबडा (रा. दिल्ली) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. समृद्धी महामार्गावरुन प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची तस्करी होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सापळा रचला असता दिल्लीकडून येणारा आरजे. ५२ जी.ए. ५६७० क्रमांकाचा कंटेनर येत होता. पोलिसांनी कंटेनरला थांबवून पाहणी केली असता कंटेनरमध्ये समोरील भागात इलेक्ट्रीक साहित्य आणि जोडे होते. पण, अधिक तपासणी केली असता पोलिसांना सुगंधित तंबाखूसाठा आढळून आला. त्यातच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले कंटेनर असा एकूण एक कोटी सहा लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दिल्लीतून मुंबईला येत होता माल
तंबाखू दिल्ली येथून समृद्धी महामार्गाने मुंबई येथे जात असल्याचे सांगितले. तसेच हा माल दीपक ट्रान्सपोर्टचे मालक व विकास छाबडा यांचे असल्याचे सांगितले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समृद्धी महामार्गावर सापळा रचला होता. पोलिसांनी कंटेनरची झडती घेतली असता तंबाखू आढळली.