Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune illegal abortion racket: गर्भलिंग निदान; केडगाव परिसरात बेकायदा रॅकेटचा पर्दाफाश; दोन वर्षात ५००हून अधिक प्रकारांची नोंद

Pune News: पोलिस चौकशीत आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांची नावे उघड केली आहेत. त्यानुसार फरार आरोपींचा शोध सुरू आहे. आतापर्यंत 15 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून त्यापैकी एका साक्षीदाराचा जबाब न्यायालयासमोर नोंदविण्यात आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 04, 2026 | 10:11 AM
Pune News, Crime News, Female Foeticide, Maharashtra Police, Daund News

Pune News, Crime News, Female Foeticide, Maharashtra Police, Daund News

Follow Us
Follow Us:

Pune illegal abortion racket:  पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्येच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिस तपासात गेल्या दोन वर्षांत सुमारे 500 बेकायदा गर्भपात करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून आणखी दोन आरोपी फरार आहेत. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Pune Crime News)

दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे जिल्ह्यातील घसरत्या लिंग गुणोत्तरावर गंभीर चिंता व्यक्त करत या रॅकेटमधील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Pune Crime: दुहेरी हत्याकांड! पोटच्या मुलाने वडील आणि सख्ख्या भावाचा घेतला जीव; मृतदेहाशेजारीच काढली रात्र

दोन आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

या प्रकरणात पोलिसांनी 20 मे रोजी केडगाव येथून अहमदनगर जिल्ह्यातील अण्णासाहेब गिरी या बोगस डॉक्टरला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार 24 मे रोजी वाघोली येथून अतुल जाधव याला ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींना दौंड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

प्रत्येक प्रकरणातून 35 ते 50 हजारांची वसुली

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील यांनी सांगितले की, मे 2026 मध्ये एका महिलेची गर्भलिंग तपासणी केल्याचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला होता. त्यानंतर तांत्रिक पुरावे आणि व्हिडीओच्या आधारे तपासाची गती वाढविण्यात आली. तपासादरम्यान हे बेकायदा कृत्य रुग्णालयात नव्हे, तर एका जुन्या घरात सुरू असल्याचे उघड झाले. या घरातील एका खोलीत इंजेक्शन, औषधे, वैद्यकीय साहित्य आणि इतर उपकरणे आढळून आली. पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने गर्भलिंग तपासणी करून त्यानंतर बेकायदा गर्भपात करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यासाठी प्रत्येक महिलेकडून 35 हजार ते 50 हजार रुपये आकारले जात होते.

Beed Crime: हुंडाबळीचा आणखी एक बळी! ‘पैसे घेऊन ये’ म्हणत सतत छळ; 20 वर्षीय पूजाने उचललं टोकाचं पाऊल

डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू

पोलिस चौकशीत आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांची नावे उघड केली आहेत. त्यानुसार फरार आरोपींचा शोध सुरू आहे. आतापर्यंत 15 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून त्यापैकी एका साक्षीदाराचा जबाब न्यायालयासमोर नोंदविण्यात आला आहे. आरोपींची बँक खाती, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि अन्य डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण सुरू आहे.

बाललिंग गुणोत्तरावर चिंता; मकोकाची मागणी

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपातासारखे गुन्हे हे वैयक्तिक नसून संघटित टोळ्यांमार्फत चालविले जातात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये मकोकासारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई होणे आवश्यक आहे. त्यांनी एका अहवालाचा हवाला देत सांगितले की, पुणे जिल्ह्यात सध्या दर एक हजार मुलांमागे केवळ 864 मुलींचा जन्म होत आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलिस प्रशासनाकडून मागविण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार काही डॉक्टरांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. संपूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी डॉक्टर आणि संबंधित रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास त्यांचे वैद्यकीय परवानेही रद्द करण्यात येतील.

– डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे.

 

 

Web Title: Pune illegal abortion racket 2026 female foeticide case kedgaon daund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • crime news
  • Daund News
  • Maharashtra Police
  • pune news

संबंधित बातम्या

मलम कागदावर, औषध रिकाम्या बाटल्यांमध्ये; FDA च्या तापासातून दवाखान्यांतील धक्कादायक प्रकार उघड
1

मलम कागदावर, औषध रिकाम्या बाटल्यांमध्ये; FDA च्या तापासातून दवाखान्यांतील धक्कादायक प्रकार उघड

मुळशीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?
2

मुळशीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला
3

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला

खबरदार! कोर्टरूममध्ये रील्स काढणे पडेल महागात; बार कौन्सिलची नवी आचारसंहिता जारी
4

खबरदार! कोर्टरूममध्ये रील्स काढणे पडेल महागात; बार कौन्सिलची नवी आचारसंहिता जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.