दिल्ली बॉम्बस्फोटानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 'हाय अलर्ट'; अनेक ठिकाणी वाढवली सुरक्षा (फोटो - सोशल मीडिया)
पुण्यातील कोंढवा भागात ATSचं सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांसह हे संयुक्त सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा मिळून हे संयुक्त ऑपरेशन सुरू राबवले आहे. या सर्च ऑपरेशनदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या कारवाईमुळे पुण्यासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोंढवा परिसरात दहशतवादी संबंधांबद्दल माहिती मिळाल्यानंतर, दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि पुणे पोलिसांनी १९ ठिकाणी छापे टाकले. अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली आणि काही महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. एका गुप्त माहितीवरून कारवाई करत, रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू राहिली. छापे टाकलेल्या घरांमधील लोकांची ओळख आणि पार्श्वभूमी तपासण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बुधवार रात्रीपासूनच पुण्यातील कोंढवा भागाला छावणीचं स्वरूप आलं आहे. देशविरोधी कारवाई होणार असल्याचे इनपुट्स पुणे पोलिस आणि एटीएसला मिळाले होते. तसेच हीच कारवाई पिंपरी-चिंचवडमध्ये देखील सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. कोंढवा परिसरात संशयितांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते. पुणे पोलिस आणि एटीएसचे जवळपास 350 कर्मचारी पुण्यातील कोंढवा भागात तैनात करण्यात आले आहेत. काही संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्यापैकी काही जणांची कसून चौकशी देखील करण्यात आली.दोन वर्षांपूर्वी याच कोंढवा परिसरातून संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.आणि पुन्हा एकदा देशविरोधी कारवाई करण्यासाठी काही संशयित तयारी असल्याते एटीएस व पोलिसांना समजताच ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कोंढवा परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे.






