रणजित कासलेला कोर्टाचा दणका; तब्बल 'इतक्या' दिवसांची सुनावली कोठडी
कराड : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मोरगिरी (ता. पाटण) येथील रविंद्र ज्ञानदेव मिसाळ यास दोन वर्षे सश्रम कारावास आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा कराड येथील विशेष न्यायाधीश दिलीप भा. पतंगे यांनी सुनावली.
ग्रामसेवक चंद्रवदन साळुंके यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार कराड विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. यासाठी अतिरिक्त सरकारी वरिल राजशेखर डी. परमाज यांनी सरकार पक्षातर्फे खटल्याचे संपूर्ण कामकाज पाहून सदरील गुन्हा दोष सिद्धीस नेला. सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. यापैकी फिर्यादी आणि तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण विभाग विवेक लावंड यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.
दरम्यान, २४ मे २०२३ रोजी रोजी गावची ग्रामसभा होती. त्या ग्रामसभेला कोरम पूर्ण नसल्याने सभा तहकूब करून पुढे ढकलण्यात आल्यामुळे सर्व ग्रामस्थ निघून गेले. यानंतर फिर्यादी हे ग्रामपंचायतीसमोर उभे असताना आरोपी रविंद्र ज्ञानदेव मिसाळ हा येऊन ‘तुम्ही मला वित्त आयोगाची बँक स्टेटमेंट माहिती का दिली नाही’ असे विचारले. तेव्हा फिर्यादी यांनी वित्त आयोगाची माहिती तुमच्या अर्जात नमूद नाही, तरीही मी झेरॉक्स काढून देतो, असे सांगितले असता आरोपीने फिर्यादीच्या अंगावर धावून जावून त्यांच्या हातातील ग्रामसभा प्रोसेसिंग बुक हिसकावून त्यातील लिहिलेली पाने फाडली व त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.
दरम्यान, पाटण पोलीस ठाणे येथे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आर. डी. परमाज यांनी सरकारतर्फे एकूण २५ साक्षीदार तपासले. साक्षी व पुरावे ग्राह्य धरून महत्वाच्या धरून आरोपी रविंद्र मिसाळ यांना दोन वर्षे सश्रम कारावास व सात हजार रुपये दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.