फोटो सौजन्य: iStock
एकदा एखादी गोष्ट चोरीला गेली की गेली. ती वस्तू परत मिळणे खूप कठीण असते. अनेकदा महत्त्वाचे कागदपत्रे देखील चोरीला गेले असतील. ते देखील परत मिळणे कठीण असते. पण पंजाबमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. चोराने चोरी केल्यावर असे काही केले आहे की, ज्याचे सामान चोरी झाले होते त्याने चोराचे आभार मानले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमधील जलालाबादमध्ये एका चोरानो एका वृद्धाचे पाकीट चोरले. पाकीटे चोरी केल्यानंतर त्याने त्यामधील सर्व रक्कम काढून स्वत:च्या खिशात टाकली. परंतु त्या पाकीटामध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे होती ती त्याने त्या व्यक्तीला परत केली. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. मात्र, सात हजार रुपयांची रोकड त्यांनी स्वत:जवळ ठेवली आहे. या प्रकरणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
सर्व कागदपत्रे परत मिळाली
पीडिताने या प्रकरणाची माहिती स्थानिक प्रशासनालाही दिली नाही. कागदपत्रे मिळाल्यानंतर दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जलालाबादच्या घंगा कलान गावात ही घटना घडली. येथे राहणारे जसविंदर सिंग हे श्री अमृतसर साहिब येथे दर्शनासाठी गेले होते. त्या दरम्यान, चोराने जसविंदर यांची पर्स चोरून नेली. यानंतर जसविंदर त्याच्या घरी आले. नंतर त्यांना ही चोरी झाल्याचे समजले. काही दिवसांनी जसविंदर सिंगला पोस्टाने एक लिफाफा मिळाला. ज्यावेळी त्यांनी लिफाफा उघडला तेव्हा त्यात त्यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. या सर्व वस्तू चोरीच्या पर्समध्ये असल्याचे जसविंदर सिंगनी सांगितले.
वृद्धाने मानले चोराचे आभार
असे तर अनेक चोरीच्या घटना घडतात. मात्र या घटनेने अनेकांचे लक्ष वेधले आहे. चोराने रक्कम जरी परत केली नसली तर त्याने महत्त्वाची कागदपत्रे परत केल्याने जसविंदर सिंगने चोराचे आभार मानले आहेत.जसविंदर सिंग म्हणतात की, कागदपत्रे मिळाल्याने मला आनंद झाला आहे. चोरात थोडी माणुसकी असते. कागदपत्रे परत केल्याबद्दल चोराने मानवी सहानुभूती दाखवल्याचे त्यांनी सांगितले. चोरीच्या घटना वारंवार घडतात, मात्र या घटनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, चोरट्याने सात हजारांची रोकड परत केली नाही.
चोराने पत्र पाठवून मागितली माफी
अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातून समोर आली होती. बालाघाट जिल्ह्यातील एका मंदिकामध्ये चोरी झाली होती. चोराने मंदिरातून सामान चोरले. पण नंतर त्याचे मन बदलले. मग चोराने सर्व सामान मंदिरात परत केले. आश्चर्याची बाब म्हणजे चोराने सामानासोबत एक माफी मागितल्याचा कागदही ठेवला.