अलिबाग : रायगड जिल्ह्यातील (Raigad District) पोलीस भरतीला (Police Bharti Update) डाेपिंगचे (Doping) ग्रहण लागले आहे. मैदानी चाचणीमध्ये (Ground Test) फायदा करुन देणाऱ्या औषधी द्रव्यांसह तीन जणांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) सदरची कारवाई केली आहे. पाेलिसांनी ताब्यात घेतलेल्यांपैकी एकाची मैदानी चाचणी ७ जानेवारी राेजी पार पडली आहे, तर दुसऱ्या उमेदवाराची ८ जानेवारीला मैदानी चाचणी होणार हाेती. अन्य तिसरी व्यक्तीही दाेन उमेदवारांच्या साेबत हाेती.
अलिबाग (Alibaug) येथील वरसाेली (Varsoli) अजय तिवरेकर (Ajay Tiverekar) यांच्या मालकीच्या काॅटेजमध्ये अहमदनगर, पुणे जिल्ह्यातून तीन व्यक्ती आल्या आहेत. ते पोलीस भरतीसाठी आले हाेते. पाेलिसांनी ताब्यात घेतलेल्या उमेदवारांकडे काही औषधी द्रव्य असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकली. त्यामध्ये पाेलीसांना एक ग्रे रंगाच्या चैनचे पाऊच सापडले.
[read_also content=”Shocking! दिल्लीची मान पुन्हा शरमेने खाली झुकली; पतीने गर्भवती महिलेला जाळले, DCW ने पाठवली पोलिसांना नोटीस https://www.navarashtra.com/crime/crime-shocking-once-again-delhi-was-put-to-shame-husband-in-laws-burn-pregnant-woman-by-petrol-dcw-sent-notice-to-police-nrvb-360533.html”]
त्यात दोन न्युरोक इन्ड गोल्ड इंजेक्शन तसेच नाव नसलेल्या तीन द्रव्यांच्या बाटल्या सापडल्या आहेत. तसेच पाच ओमेगा व्हीआयटी सीई टॅबलेटस, तीन निप्रो कंपनीच्या सिरींज सुईसह एक डिस्पाेव्हॅन कंपनीची हायपाेडर्मिक सिरींज, डिस्पाेव्हॅन कंपनीच्या सहा पॅक बंद असलेल्या ४४ डीच्या नीडल्स, एक लाल रंगाची कॅप्सुल,डिस्पोव्हॅन कंपनीच्या दोन ३२ एनच्या नीडल्स, एक बीडी यू ४० इन्सुलिन असे नाव असलेली सिरींज निडल्ससह त्यामध्ये औषधी द्रव्य भरलेले साहित्य पाेलिसांना सापडले आहे.
पाेलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केल्यावर सदरची औषधी मैदानी खेळा आधी घेतल्यास त्याचा फायदा मैदानी चाचणी मध्ये होत असल्याचे सांगितले. अलिबाग जिल्हा सरकारी रुग्णालयात तिन्ही व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तसेच मुंबई आणि नवी मुंबई येथील प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तूर्तास तिन्ही व्यक्तींना साेडून देण्यात आले आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
[read_also content=”लिफ्टमध्ये केलेली मस्ती आली अंगाशी, महिलेला पाहून सुरु केलेल्या चाळ्यांचा VIDEO चं आला समोर, आता जेलवारी पक्की ? https://www.navarashtra.com/crime/navi-mumbai-crime-a-case-has-been-registered-against-a-young-man-who-committed-obscene-acts-on-seeing-a-woman-nrvb-360484.html”]
भरती प्रक्रियेकरिता येणाऱ्या उमेदवारांनी सरकारने प्रतिबंधित केलेल्या काेणत्याही वस्तू, पदार्थ, उत्तेजक द्रव्याचे सेवन करू नये. भरती प्रक्रियेला सामोरे न जाता अशा उपायांचा अवलंब करू नये. प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. जे उमेदवार असे गैरप्रकार करताना आढळून येतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड