गायक आणि संगीतकार सचिन संघवी यांच्यावर एका २० वर्षीय तरुणीने लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केले आहेत. याप्रकरणी सचिन सिंघवी यांना जमीन मिळाली आहे. तक्रारदार तरुणीच्या वकिलांनी महत्वाची माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी माध्यमांना एक आवाहन देखील केले आहे.
पीडितेच्या वकिलांनी काय दिली माहिती
सचिन सिंघवी यांना जमीन मिळालेला आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणावर पीडितेचे वकील निशांत जौहरी यांनी एक निवेदन जारी केले आहे.
सोबतच त्यांनी माध्यमांना या प्रकरणी रिपोर्टींग करतांना थोडी काळजी घ्यावी, असेही सांगितले आहे. या घटनेत माझ्या अशिलाला न्याय देण्यासाठी मी सर्व पर्यायांचा अवलंब करणार आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे या प्रकरणात सध्यातरी अधिक बोलणे योग्य होणार नाही, असे जौहरी यांनी म्हटले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
संचित सिंघवी जे गायक आणि आणि संगीतकार आहे. सचिन संघवी यांनी स्त्री-2, भेडिया यासारख्या चित्रपटांना सुपरहिट गाणे दिले आहेत. सचिन यांनी एका २० वर्षीय तरुणीला म्युझिक अल्बममध्ये काम देतो असे सांगितले. नंतर तिच्यासोबत लग्न करण्याचेही आश्वासन देऊन तिचे शारीरिक शोषण केले. या दोघांची फेब्रवारी 2024 मध्ये पहिल्यांदाच भेट झाली होती, असा दावा करण्यात आला आहे.
लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि…
सचिन यांना पीडित तरुणीने अगोदर इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवला होता. पुढे सचिन यांनी या तरुणीला म्युझिक अल्बममध्ये काम देण्याचे आश्वासन दिले होते. सचिन यांनी त्या तरुणीला स्टुडिओत बोलून तिच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. नंतर वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण करण्यात आले, असा दावा करण्यात आला आहे.
आरोप फेटाळले
या प्रकरणात सचिन संघवी यांची बाजू वकील आदित्य मोठे हे मांडत आहे. त्यांनी सचिन त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहे, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमके काय घडणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






