कायमच साधं वरण खाऊन कंटाळा आला असेल तर हिरव्या मिरच्यांपासून बनवा झणझणीत आमटी
संध्याकाळच्या जेवणात कायमच डाळ, भात, चपाती, भाजी इत्यादी पदार्थ बनवले जातात. कायमच डाळ भात खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी टोमॅटोचा सार, तिखट आमटी किंवा दह्याची कढी बनवून खाल्ली जाते. पण आज आम्ही तुम्हाला हिरव्या मिरच्यांची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हिरव्या मिरच्यांची आमटी तुम्ही भाकरी, चपाती किंवा वाफाळत्या भातासोबत सुद्धा खाऊ शकता. ही आमटी चवीला तिखट आणि सुंदर लागते. कायमच साधी डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर झणझणीत पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. हिरव्या मिरच्यांची आमटी बनवण्यासाठी स्वयंपाक घरातील विशेष मसाल्यांचा वापर केला जातो. या मसाल्यांच्या वापरामुळे पदार्थाची चव वाढते आणि जेवण आणखीनच सुंदर लागत. चला तर जाणून घेऊया झणझणीत हिरव्या मिरच्यांची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






