उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मित्रांनी त्यांच्या एका मित्राचे गुप्तांग कापून टाकल्याचं सांगितल जात आहे. हे कृत्य किरकोळ वादातून करण्यात आल्याचं समोर आलं आहे. नेमकं काय प्रकरण?
नेमकं काय प्रकरण?
तिघे मित्र रात्री पार्टी करत होते. त्यावेळी तिघांनीही खूप मद्यपान केले. त्यानंतर, दोन मित्रांचा पीडित तरुणासोबत कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. याच वादातून तिघांमध्ये मारहाण सुरु झाली. यानंतर दोन मित्रांनी मिळून तिसऱ्या तरुणाचं गुप्तांग चाकूने कापून टाकलं आणि आरोपी तरुण तिथून पळून गेले. पीडित तरुणाची प्रकृती गंभीर जखमी असून त्याच्यावर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहे. ही संपूर्ण घटना रॉबर्ट्सगंज पोलीस स्टेशन हद्दीतील चुर्क चौकी परिसरात घडली.
पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल
स्थानिक नागरिकांना या धक्कादायक घटनेची माहिती मिळाली. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून 28 वर्षीय जखमी तरुणाला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं. पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही संपूर्ण घटना रॉबर्ट्सगंज पोलीस स्टेशन हद्दीतील चुर्क चौकी परिसरात घडली.
चौकशीत समोर काय?
पोलिस चौकशीदरम्यान, पीडित तरुणाने सांगितलं की तो त्याचे मित्र राजेश आणि भवानी यांच्यासोबत रात्री पार्टी करत होता. पार्टीमध्ये त्याचं त्याच्या मित्रांसोबत मोठं भांडण झालं आणि त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्यावर चाकून हल्ला केला. आता, पोलिसांनी या प्रकरणाबाबच गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींची चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रियकर–प्रेयसीनं हातात हात धरून ट्रेनसमोर मारली उडी, नग्न अवस्थेत सापडला प्रेयसीचा मृतदेह!
उत्तरप्रदेश येथील गोरखपूरमध्ये प्रियकर आणि प्रेयसीने ट्रेनसमोर उडी मारून आपलं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. यात धक्कदायक बाब म्हणजे तरुणीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर नग्न अवस्थेत सापडला आणि तिच्या बाजूलाच तिच्या प्रियकराचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते पोस्टमार्टमसाठी पाठवले. 21 वर्षीय विश्वकर्मा कुमार अशी मृत तरुणाची ओळख पटली तर १८ वर्षीय तरुणी सुद्धा त्याच शहरातील रहिवासी होती. तरुण हा पिपराइच पोलिस स्टेशन परिसरातील वॉर्ड क्रमांक 11चा रहिवासी होता. ही संपूर्ण घटना पिपराइच पोलीस स्टेशन हद्दीत घडली.
एसटी प्रवासात दोन लाखांचा ऐवज चोरीला; सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास






