आर्यन खान ड्रग्स प्रकरणी (Aaryan Khan Case) रोज काही ना काही धक्कादायक बाबी समोर येत आहे. या कथित खंडणी कांडात काल समीर वानखेडे आणि अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि समीर वानखेडेची (sameer wankhede) चॅट (whatsapp chat) व्हायरल झाल्यानंतर वेगळाच ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी आता समीर वानखेडे आता सीबीआय कार्यालयात हजर झाले आहेत. यावेळी त्यांनी सत्यमेव जयते सीबीआय कार्यालयात हजरी लावली. आता या प्रकरणात आणखी नवे कोणते खुलासे होतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
[read_also content=”आर्यन खान ड्रग्स प्रकरणी मोठी बातमी! समीर वानखेडे आणि शाहरुख खानमध्ये अनेक वेळा झालं संभाषण https://www.navarashtra.com/crime/sameer-wankhede-and-shah-rukh-khan-had-many-conversations-during-aryan-khan-drug-case-nrps-401546.html”]
समीर वानखेडे आणि शाहरुख खानमध्ये अनेक वेळा संभाषण झाल्याची माहिती काल समोर आली. यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. या चॅटमध्ये शाहरुख खानने लिहिले होते, भगवान के लिए अपने बंदों से कहो कि जल्दबाजी न करें.. मी शपथ घेतो की मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहीन आणि तुला जे काही साध्य करायचे आहे किंवा साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे त्यात मी तुला मदत करीन. हे वचन आहे आणि ते करण्यास सक्षम असण्याइतपत तु मला चांगले ओळखता. मी तुला विनंती करतो की कृपया माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर दया कर. आम्ही साधी माणसं आहोत आणि माझा मुलगा थोडासा मनमौजी स्वभावाचा आहे. पण कठोर गुन्हेगाराप्रमाणे तुरुंगात डांबण्याइतका वाईट नाही. हे तुलाही माहीत आहे. मी तुला विनवणी करतो, दया कर.
समीर वानखेडेवर (Sameer Wankhede) आर्यन खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपये वसूल करण्याचा प्लॅन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्यन खानला आरोपी न करण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचं सांगण्यात येत आहे. या आरोपाखाली सीबीआयने समीर वानखेडविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सीबीआयने अलीकडेच वानखेडे आणि इतर चार जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. वानखेडे यांनी उच्च न्यायालयाच्या सुट्टीतील खंडपीठासमोर दाखल केलेल्या याचिकेत सीबीआयकडे दाखल केलेल्या एफआयआरच्या संदर्भात आपल्यावर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, अशी विनंतीही केली आहे. वानखेडे यांच्या अर्जावर खंडपीठाचा निर्णय येणे बाकी आहे.
एनसीबीनं 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीनं या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यानंतर एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती.