खोक्याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट देणं दोन पोलिसांना भोवलं (फोटो सौजन्य-X)
बीड : सतीश भोसले ऊर्फ खोक्या भाई याची राज्यभरात सध्या चर्चा सुरु आहे. सतिश भोसले याला प्रयागराज येथून अटक करण्यात आला. त्यानंतर त्याला बीड येथे आणण्यात आले. त्याच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला. पण, आता त्याला तुरुंगात शाही पाहुणचार मिळत असल्याचे समोर आले आहे. शाही बडदास्त ठेवत असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
खोक्या भाईने एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण केली. तसेच इतर दोन प्रकरणात बीडचा खोक्या भाई राज्यभरात अचानक चर्चेत आला आहे. त्याचे कारनामे समोर आले आहेत. प्रयागराज येथून त्याच्या मुसक्या आवळत त्याला बीडला आणण्यात आले. त्याच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला. पण आता बीड पोलीस त्याची शाही बडदास्त ठेवत असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सतीश भोसले ऊर्फ खोक्याला देण्यात येत असलेली व्हीआयपी ट्रीटमेंट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
बिर्याणीचा डब्बा अन् बरंच काही…
व्हिडिओत खोक्यासोबत भाजप नेते सुरेश धस यांचे कार्यकर्ते आणि बीड जाळपोळ प्रकरणातील आरोपी अजिंक्य पवळ तसेच इतर गुन्हेगार मुक्त संचार करताना दिसत आहेत. यामुळे, न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुख्यात आरोपींसाठी पोलिसांची ही ‘शाही व्यवस्था’ नक्की कशासाठी आणि कोणाच्या आदेशावर सुरू आहे? असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, त्याच्यासाठी खास बिर्याणीचा डब्बा आणण्यात आल्याचेही दिसले.
बीड पोलिसांना सापडला खोक्या
गुन्हा दाखल झाल्यापासून हा खोक्या भोसले हा फरार होता. पोलिसांची पथकेही त्याचा शोध घेत होते. सतीश भोसलेचे शेवटचे लोकशन प्रयागराज याठिकाणी दिसले. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि प्रयागराज पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी सापळा रचून सतीश भोसलेला अखेर ताब्यात घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेला आज पोलिस कोठडी संपल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सुनावणीत कोर्टाने खोक्या भोसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. शिरूर येथील पिता-पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्या भोसलेला पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली आहे. त्यानंतर त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडी संपल्यानंतर त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बीड कारागृहाबाहेरचा व्हिडिओ समोर
पोलिसांकडून खोक्याची शाही बडदास्त ठेवण्यात येत असल्याचा व्हिडिओसमोर आला. हा व्हिडिओ बीड कारागृहाबाहेरचा आहे. कारागृहाबाहेर खोक्या बिनधास्त मोबाईलवर बोलतानाचे त्यात समोर आले.