दिवसेंदिवस राज्यात गुन्हे वाढताना दिसत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा काही धाक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. क्षुल्लक कारणावरुन हत्या होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. असाच एक प्रकार डोंबिवलीमधून उघडकीस आला आहे. डोंबिवली (Dombivli Crime News) परिसरातील पश्चिम कोपर रोड परिसरात दारु पिण्यासाठी पैसे आणि बसण्याठी खुर्ची देण्यास नकार देणाऱ्या सुरक्ष रक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात सुरक्षारक्षकाचा जखमी झाला असून या प्रकरणी आरोपी हर्षद कुशाळकरला अटक करण्यात आली आहे.
[read_also content=”चिमुकल्याची महाकाय अजगरसोबत मैत्री! अंगाखांद्यावर खेळतोय, हाताने जबडा उघडतोय; Video पाहून भरेल धडकी https://www.navarashtra.com/viral/child-playing-with-giant-python-shocks-people-calls-parents-irresponsible-nrps-431657.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली परिसरातील पटेल आर मार्ट बाहेर गुरुवारी रात्री हा प्रकार घडला असून याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी आरोपी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुरक्ष रक्षका मुन्नीराम सहानी याला ठाणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करन्यात आले आहे.
डोंबिवली पश्चिम कोपर रोड परिसरात असलेल्या पटेल आर मार्ट मध्ये मुन्नीराम सहानी हे सेक्युरिटी गार्ड आहेत. गुरुवारी रात्रीच्या सुमारास सहानी कर्तव्यावर असताना पाऊस आला म्हणून दुकानासमोर टेम्पो मध्ये बसले होते. यावेळी हर्षद त्या ठिकाणी आला.त्याने सहानी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले त्यानंतर वॉचमन साठी असलेली खुर्ची बसण्यास मागितली. मात्र सहानी यांनी नकार दिला.त्यामुळे संतापलेल्या हर्षदने शिवीगाळ करत सहानी यांच्या डोक्यात बाजूला पडलेला दगड घातला त्यानंतर पुन्हा घातला व तिथून निघून गेला .या हल्ल्यात सहानी गंभीर जखमी झाले. तर या प्रकरणी गुन्हा दाखल करत विष्णू नगर पोलिसांणी हल्लेखोर हर्षद कुशाळकर याला सिद्धार्थ नगर येथून बेड्या ठोकल्यात असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे हे करीत आहेत.