मुंबई: मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ नका परिसरात सुद्धा बांधकाम इमारतीमधून लोखंडी रॉड कोसळून एका तरुणाची दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचा नाव अमर आनंद पगारे (३०) असे आहे. आनंद पगारे हे नाशिकहून मुंबईत फिरण्यासाठी बुधवारी आले होते. आणि त्याच दिवशी 11 च्या सुमारास त्यांच्यावर काळाने घात केला.
मरोळ नाका परिसरामध्ये यावेळी प्रेविलोन या विकासाकाकडून सुरू इमारतीचा बांधकाम सुरु आहे. त्या इमारतीच्या सातवा मजल्यावरून लोखंडी रॉडने कोसळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी येथील कूपर रुग्णालयात पाठवला आहे.
याआधीही मुंबई शहरातील जोगेश्वरी परिसरात बांधकाम इमारतीमधून सिमेंट ब्लॉक डोक्यावर पडल्याने १९ वर्षीय संस्कृतीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांना आता मुंबईच्या मरोळ नाका परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बांधकाम इमारतीच्या सुरक्षाव्यवस्था राम भरोसे आहेत का? असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांकडून विचारला जात आहे. सध्या या घटनेमध्ये चूक कोणाची आहे, कशामुळे ही घटना घडली? यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
आर्मी हेडक्वॉर्टरमधून कर्नलच्या केबिनची चोरी! पिस्तुल, काडतूसे आणि रोकड लंपास
मुंबईतील आर्मी हेडक्वॉर्टरची कडेकोट सुरक्षा भेदून एका कर्नलच्या केबिनमधून तिघा चोरट्यांनी पिस्तुल, ९ जीवंत काडतूसे, चांदी आणि तीन लाखांची रोकड पळवली. आरोपींनी आर्मी हेडक्वॉर्टरच्या मागच्या रस्त्यातून आत शिरकाव केला आणि चोरी केली. चोरी केल्यानंतर हे सर्व आरोपी गोव्याला पळाले आणि त्यांनी तेथे मौजमजा केली. जेव्हा ते मुंबईला आले तेव्हा त्यांना अटक केली.
हे सर्व आरोपी मालाडच्या कुरार परिसरात रहात होते. मालाड येथून आरोपींना क्राईम ब्रँचने अट केली. त्यांच्याकडून कर्नलची पिस्तुल, ९ जीवंत काडतूसे, साडे चारशे ग्रॅम चांदी आणि तीन लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. तसेच चोरीच्यावेळी वापरलेले काही सामानही पोलिसांनी जप्त केले आहे.
सोमवारी क्राईम ब्रँच युनिट १२ च्या टीमने आरोपींना दींडोशी पोलिसांच्या हवाली केले. त्यांनी याआधी अनेक चोऱ्या केल्या आहेत. त्यांच्या विरोधात चोरी आणि लुटमारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी सराईत चोर असून अनेक ठिकाणी त्यांनी चोऱ्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास दींडोशी पोलिस करणार आहेत. याआधी कुलाबा नेव्हीनगरात एका जवानाची इन्सास रायफल चोरट्याने पळवल्याची घटना घडली होती. आता थेट आर्मी हेडक्वॉर्टरवरच चोरट्यांनी डल्ला मारल्याचे उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Ans: मरोळ
Ans: नाशिक
Ans: एमआयडीसी पोलीस






