डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी परिसरातील मालवण किनारा बार अँड रेस्टॉरंटजवळ हत्या झाली होती. या हत्या प्रकरणाचा मानपाडा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत ६ आरोपींना अटक केली आहे. हत्येची घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा बारा वाजता घडली होती. मृत्यू झालेल्या ३८ वर्षीय आकाश भानू सिंग असे नाव आहे.
Mumbai Crime: दुर्दैवी! मुंबईत उंच इमारतीतून लोखंडी रॉड पडून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू
त्या रात्री काय घडलं होत नेमकं?
आकाश सिंग आपल्या मित्रांसह जेवणासाठी मालवण किनारा बारमध्ये गेला होता. प्रवेश करताना त्याचा अक्षय वागळेला धक्का लागला. चुकून धक्का लागल्याचे समजावून सांगूनही अक्षय संतापला आणि त्याने आकाशला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर अक्षयने आपल्या मित्रांना फोन करून बोलावले. सहा जणांनी मिळून आकाशला बारमधून ओढत बाहेर आणले आणि रस्त्यावर बेदम मारहाण करून चाकूने सपासप वार केले. आकाश जागीच ठार झाला. त्याला वाचवण्यासाठी सुनील कागले यांनी प्रयत्न केला असता, टोळक्याने त्यांच्यावरही चाकूने वार करून जखमी केले. त्याचा जागीच मृत्यू झाला.
तपास सुरु
याप्रकरणी नवी मुंबईतील कॉल सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या आकाशचा धाकटा भाऊ बादल सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मानपाडा पोलिसांनी तत्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. घटनास्थळी कोणतेही पुरावे न सापडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते. तांत्रिक विश्लेषण आणि खबरींच्या मदतीने आरोपींचा ठावठिकाणा नाशिकपर्यंत शोधला. तांत्रिक विश्लेषण आणि खबरींच्या मदतीने आरोपींचा ठावठिकाणा नाशिकपर्यंत शोधला.
थरारक पाठलाग
पोलीस पाहताच आरोपींनी पळ काढला आणि गल्लीबोळांत थरारक पाठलाग सुरु झाला आहे. अखेर फिल्मीस्टाईल सहाही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. या हत्येचा उलगडा अवघ्या 24 तासांत करणाऱ्या मानपाडा पोलीस पथकाचे ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी कौतुक केले आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींचा नाव अमर राजेश महाजन (वय 36), अक्षयकुमार शंकर वागळे (वय 26), अतुल बाळू कांबळे (वय 24), निलेश मधुकर ठोसर (वय 42), प्रतिकसिंग प्रेमसिंग चौहान (वय 26) आणि लोकेश नितीन चौधरी (वय 24) असे आहेत.
Kolhapur Crime: कोल्हापुरात अंधश्रद्धेचा कहर! चुटकी वाजवत भूतबाधा काढतो मांत्रिक, व्हिडीओ व्हायरल
Ans: किरकोळ धक्का लागल्यावरून
Ans: सहा
Ans: 24 तासांत






