बीडमधील परळी येथे मुंडे गँगकडून शिवराज दिवटे या तरूणाला बेदम मारहाण
बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनेने खळबळ उडवली आहे. परळी येथील शिवराज हनुमान दिवटे या तरुणाचे अपहरण करून त्याला निर्घृण मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. या मारहाणीचा भयावह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये समाधान मुंडे आणि त्याचे काही साथीदार शिवराज दिवटे याला बेदम मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहेत. शिवराजला जमिनीवर पाडून चारही बाजूंनी काठ्या आणि बांबूच्या साहाय्याने प्रचंड मारहाण करण्यात आली.
शिवराज वेदनेने जोरजोरात ओरडत असतानाही समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण थांबवली नाही. या क्रूर हल्ल्यात शिवराज गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परळी येथील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी सायंकाळी सुमारे ४ वाजता शिवराज हनुमान दिवटे याचे अपहरण करण्यात आले. शिवराज जलालपूर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरून घरी परतत असताना ही घटना घडली.
शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यानं केलं मोठं विधान
अपहरणानंतर त्याला टोकवाडी येथील रत्नेश्वर मंदिर परिसरात नेण्यात आले, जिथे समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी त्याच्यावर अमानुष मारहाण केली. विशेष म्हणजे, या मारहाणीचा व्हिडीओ समाधान मुंडेच्या साथीदारांनी मुद्दाम चित्रीत केला होता, जो दहशत पसरविण्याच्या उद्देशाने नंतर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.
या धक्कादायक व्हिडीओमुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला उजाळा मिळाला आहे. या प्रकरणी बीड पोलिसांनी समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे आता पोलिसांची पुढील कारवाई काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Almatti Dam: अलमट्टी धरणाचा मुद्दा तापणार! रविवारी अंकली टोलनाक्यावर…
बीड जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ३ जून २०२५ पर्यंत जिल्ह्यात ड्रोन व अन्य मानव रहित यंत्र उडविण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, संभाव्य धोके लक्षात घेऊन ही प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.