सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवक काँग्रेसचे सरचिटणीस ओंकार हजारे याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ओंकार हजारे याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आत्महत्या केल्याचं कोणताही कारण अद्याप समोर आलेला नाही आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Crime News: जमिनीच्या व्यवहारात फसवणूक, १२ जणांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
नेमकं काय घडलं?
ओंकार हा रविवारी रात्री आपल्या गाडीत बेशुद्ध अवस्थेत आढलून आला. कुटुंबीयांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणताही प्रतिसाद न दिल्याने बेशुद्धावस्थेतच तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोधित केलं. ओंकार याने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. दरम्यान या ओंकार यांच्या मृत्यू संधर्भात सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय. पुढील तपास पोलिस करत आहे. या घटनेमुळे सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
ओंकार हजारे (वय 32, रा. पापय्या तालीम परिसर, मुरारजी पेठ, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ओंकार हजारे यांचा 2019 मध्ये विवाह झाला होता. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. मागील काही महिन्यांपासून ओंकार हे कौटुंबीक कारणांमुळे निराशाच्या गर्तेत होते. त्यांच्या मेव्हण्याचे रविवारी (ता. 08 जून) लग्न होते. मात्र, त्या लग्नाचे निमंत्रणही ओंकार हजारे यांना देण्यात आलेले नव्हते, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. रविवारी (ता. 08 जून) सकाळपासून ते कोणालाही काही न बोलता घरातून बाहेर पडले होते. बराच वेळ घरी न आल्याने घरच्यांनी आणि मित्रांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शोधाशोध करूनही ते सापडत नव्हते. शेवटी सुपर मार्केटजवळ थांबलेल्या मोटारीत ते सीटवर बसल्याचे दिसून आले. आवाज देऊनही ते गाडीचा दरवाजा उघडत नव्हते. शेवटी गाडीचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी ओंकार हजारे यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्याच अवस्थेत ओंकार हजारे यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. फौजदार चावडी पोलिस तपास करीत आहेत.
Rain Update : मराठवाड्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होणार; नांदेड, हिंगोलीत तर…