महिलेचे झोपेत दागिने हिसकाविण्याचा प्रयत्न (संग्रहित फोटो)
ढाणकी : करंजी येथे रात्री गाढ झोपेत असलेल्या एका व्यक्तीच्या घरात शिरून चोरट्याने एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने शुक्रवारी (दि. 4) लंपास केले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवाजी माधव पलेकोंडवाड (रा. करंजी) असे मुद्देमाल चोरी गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते घटनेच्या दिवशी आपल्या पत्नीसह सावळेश्वर येथे लग्न समारंभाला गेले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान घरी परतले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने झुंबर, सेवनपिस, कानातील बाळंगड्या आदी दागिणे काढून बंद डब्यात ठेवले होते. रात्री 11 वाजताच्या दरम्यान झोपी गेले असताना चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत घरात शिरून दागिने ठेवलेला डब्बा घेऊन पोबारा केला.
हेदेखील वाचा : पत्नीच्या छळाला कंटाळून एका तरुणाने केली आत्महत्या; प्रियकरासोबत मिळून तुला संपवेन….
याशिवाय, एक चोरटा पत्नीच्या गळ्यात असलेली मंगळसूत्र हिसकावत असताना पत्नीला जाग आली. मात्र, तोपर्यंत चोरटा दागिन्यासह पळ काढण्यात यशस्वी ठरला. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवाजी यांच्या पत्नीने डब्यात ठेवलेल्या दागिन्यांची तपासणी केली. मात्र, चोरट्यांनी दागिन्यांसह डब्बा लंपास केल्याचे लक्षात आले.
दरम्यान, गावकऱ्यांनी चोरीची घटना पोलिसांना कळविली. त्यावरून बिटरगाव पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शिवाजी यांना तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशन बिटरगाव येथे बोलावले. शनिवारी (दि. 5) पोलिसांनी घटनास्थळांचा पंचनामा केला. शिवाजी पलेकोंडवाड यांचा जबानी रिपोर्ट घेतला. पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सरू केला.
चोरींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ
बिटरगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या घटनेत वाढ झाली असून, चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला नाही. 8 दिवसापूर्वी गांजेगावात दिवसा ढवळया चोरट्यांनी एकाच दिवशी दोन घर लाखोंचा मुद्देमाल चोरी नेल्याची घटना ताजी असताना शुक्रवारच्या रात्री पुन्हा चोरीची घडना घडली.
हेदेखील वाचा : Amravati Crime News: अमरावतीतील अघोरी अंधश्रद्धेचा कहर; १० दिवसांच्या बाळाला गरम विळ्याचे ३९ चटके; संतापाची लाट