उत्तरप्रदेश येथील सहारनपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने पत्नीच्या छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गळफास लावलेल्या तरुणाचे नाव सौरभ असे आहे. सौरभचे लग्न पाच वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांना चार वर्षांचा एक मुलगाही आहे.
सत्यनारायण पूजा होताच नववधूने ठोकली धूम; तब्बल 3.66 लाखांची ‘अशी’ केली फसवणूक
सौरभच्या कुटुंबियांचे आरोप
सौरभच्या कुटुंबीयांनी त्याची पत्नी शालू, सासू ममतेश आणि शालूच्या एका मित्रावर छळ आणि त्रासाचे गंभीर आरोपी केले आहेत. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, शालूचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ते सौरभवर सतत दबाव टाकत होते की, त्याने आपल्या वाट्याची मालमत्ता विकून ‘घरजावई’ म्हणून त्यांच्यासोबत राहावे. याच गोष्टीवरून शालू सौरभला सतत त्रास देत होती.
शालू अनेक तरुणांच्या संपर्कात होती आणि तिच्याशी फोनवर बोलत होती. एवढेच नाही, तर ती अनेकदा सौरभला तिच्या प्रियकरासोबत मारून टाकण्याची धमकी देत होती, त्याच्यासमोरच आपल्या प्रियकराशी बोलत होती. सौरभने याबाबतीत त्रास होत असल्याने पोलिसात तक्रार केली होती, परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. या प्रकरणी सौरभला शनिवारी चौकशीसाठी जायचे होते. मात्र त्याआधीच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. असेही त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.
सौरभच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून शालुविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याची पत्नी शालू, सासू ममतेशी आणि इतर संबंधित लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी सौरभच्या मृतदेहाला पोस्टमार्टम करीता पाठवले आहे. पोलीस अधिकारी या घटनेचा सखोल तपास करत आहे. पोलीस अधिकारी या घटनेचा सखोल तपास करत आहे. सौरभ आणि शालूचे फोन रेकॉर्डही तपासले जात आहेत.
११ वर्षीय मुलाचा लैंगिक छळ; शाळेतील कर्मचाऱ्याने बनवली अश्लील चित्रफीत आणि….