अमरावर्तीच्या मेळघाटातून धक्कादायक आणि संतापजनक घटना उजेडात आली आहे. या घटनेत पोटफुगीवर दहा दिवसाच्या बाळाला चक्क गरम विळ्याने तब्बल ३९ चटके दिल्याच्या अघोरी प्रकार समोर आला आहे. ही घटना दहेन्द्री गावात घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच सर्वत्र एकाच खळबळ उडाली असून यात चटके देणाऱ्या वृद्धमहिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गंभीर प्रकार घटनेननंतर दहा दिवसांनी उघडकीस आला आहे.
नीट बोलत नाही, भेटत नाही म्हणून शीतपेयात विष देऊन १६ वर्षीय मित्राची हत्या
पुढे आलेल्या माहितीनुसार, १० दिवसाच्या बाळावर अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.चार महिन्यापूर्वीही एका बावीस दिवसाच्या बाळाला अश्याच प्रकारे पोटावर चटके दिल्याचा प्रकार समोर आला होता. त्यातच आता ही घटना समोर आल्याने सर्वच क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डब्बा दिल्याने पोटफुगी कमी होते ही अंधश्रद्धा आजही मेळघाटात सारख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागात कायम आहे.
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही डायरेक्ट छातीवर मारतो’ असे स्टेट्स ठेवणाऱ्या तरूणाची भरदिवसा हत्या
हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता हिंगोलीच्या पाचोरा शहरातील बस स्थानक परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका तरुणाची गावठी कट्ट्याने 12 राउंड फायर करून हत्या केली. भरदिवसा झालेल्या या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली.
आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. वाळूचा व्यवसाय करणाऱ्या या तरुणाच्या शरीराची मारेकऱ्यांनी अक्षरशः गोळ्यांनी चाळणी केली. भरदिवसा घडलेल्या सिनेटाईल थरारानंतर मारेकरी पसार झाले.
हल्ल्यापूर्वी ठेवलेले स्टेट्स चर्चेत
दोन दिवसांपूर्वीच आकाशने सोशल मीडियावर ‘शेठ, तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही डायरेक्ट छातीवर मारतो, रोख आणि ठोक…’ असे व्हिडिओचे स्टेट्स ठेवले होते. त्याच अनुषंगाने मारेकऱ्यांनीही समोरुन येऊन गोळ्या झाडल्या. वाळूच्या वादातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती पुढे आली आहे.
Gopal Khemka Murder : व्यावसायिक गोपाल खेमका यांची गोळ्या झाडून हत्या; हत्येचं CCTV फुटेज आलं समोर