संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वारजे माळवाडी भागातील एका नामांकित शाळेतील ३९ वर्षीय नृत्य प्रशिक्षकाने दोन चिमुकल्या विद्यार्थिंनीशी अश्लील कृत्य करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेच्या प्रशासनाला जाब विचारून कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशीरा नृत्य प्रशिक्षकावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. नृत्य प्रशिक्षक ३९ वर्षांचा असून, तो दिघी परिसरात राहण्यास आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका पिडीत मुलगी चौथीच्या व दुसरी सहावीच्या वर्गात शिकते. शाळेत बॅड टच व गुड टच संदंर्भात एक कार्यशाळा आयोजित केली होती. त्या कार्यशाळेत मुलींनी त्यांच्यासोबत झालेल्या घटनेची माहिती दिली. नंतर शाळेने व इतरांनी या मुलींना विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर नृत्य प्रशिक्षक अश्लील कृत्य करत असल्याचे सांगितले. त्यानूसार पोलिसांनी प्रकरण गांर्भियाने घेतले. तसेच, तत्काळ गुन्हा नोंदवून त्याला अटक देखील केली. पालकांनी हा प्रकार समोर आल्यानंतर शाळेच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. संतप्त नातेवाईकांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी शाळेच्या प्रशासनाला जाब विचारला. दरम्यान, शाळेने खुलासा करत संबंधित शिक्षकावर शाळेकडून कठोर कारवाई केली असून, त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले.
हे सुद्धा वाचा : पिस्तूल बाळगणाऱ्याला सापळा रचून पकडले; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले
राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. खामगाव सनी पॅलेसस्थित आशिष गीते (वय 26) याने एका 24 वर्षीय विवाहितेचा फेसबुकवरील ओळखीचा फायदा घेत तिला बोलाविले व तिला मोटरसायकलवर बसवून शेगाव रोडने सनशाईन कॅफेवर नेले. त्या ठिकाणी तुझ्यासोबत फारकती झाल्यानंतर लग्न करेन, असे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारानंतर ‘तू माझ्यासोबत फोनवर बोलू नको’, असे म्हणून पीडित विवाहितेचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. अशा तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.