सध्या दिल्लीतील श्रध्दा वालकर हत्या प्रकरण जगभरात त्याचे पडसाथ उठत आहे. तसाच काहीसा प्रकार कोलकता येथे झाला, चक्क मुलाने वडीलांना ६ तुकड्यात कापले ते ही आई च्या सांगण्यावरून केला आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा मर्डर केसपासून प्रेरित होऊन आई आणि मुलाने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे केले.
मुलाने बाथरुमच्या आत करवतीने वडिलांचा मृतदेह कापला. ज्यामध्ये आईनेही त्याला साथ दिली. आई आणि मुलगा आधी मृतदेहाचे तुकडे सायकलवर एकत्र फेकण्यासाठी गेले. मात्र, त्यानंतर दोन वेळा मुलगा एकटाच मृतदेहाचे केलेले तुकडे सायकलवर टाकून फेकून देण्यासाठी गेला होता.
आई आणि मुलाने मिळून केली हत्या
ही हृदयद्रावक घटना कोलकात्यातील बरुईपूर भागात घडली आहे. आई आणि मुलगा या दोघांनी उज्ज्वल चक्रवर्ती या व्यक्तीची हत्या केली आणि नंतर दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने प्रेरित होऊन त्यांचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. खरे तर खुनाच्या तीन-चार तासांनंतरही आई – मुलाला काय करावे हे समजत नसताना दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणासारखेच काहीतरी करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि मुलाने वडिलांचे सहा तुकडे केले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.