सौजन्य - सोशल मिडीया
लखनऊ: मीडियाने भरलेला एक खोली, चेहऱ्यावर दुपट्टा बांधलेल्या मुली, चेहऱ्यावर दुःख, डोळ्यात न्यायाची आशा, चांगूर बाबाच्या घाणेरड्या कृत्याला बळी पडलेल्या मुली खोलीत बसल्या होत्या. सोमवारी, पत्रकार परिषदेद्वारे, त्या सर्व पीडित मुलींनी आपला आवाज उठवला आहे. बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या चांगूर बाबाने त्यांच्यासोबत चुकीचे कृत्य केले होते. यादरम्यान, सहारणपूर, लखनऊ आणि औरैया येथील दोन मुलींनी चांगूर बाबांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. चांगूर बाबाने आमिष दाखवून आणि धमकी देऊन इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचा दावा तरुणींनी केला आहे. यूपी पोलिस आणि एटीएसने या रॅकेटविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे.
लखनऊमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पीडितांनी चांगूर बाबाच्या कारनामाचा पर्दाफाश केला आहे. एका तरुणीने सांगितले की, तिला बनावट नावाने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला सौदी अरेबियात नोकरीचे आमिष दाखवण्यात आले होते, परंतु तिथे खरे वास्तव उघड झाले. आरोपी राजू राठोडचे खरे नाव रशीद होते. त्याने फसवणूक करून त्यांचे धर्मांतर केले. पीडितांनी सांगितले की, चांगूर बाबा इस्लामचा प्रचार करण्याबद्दल बोलत असे.
नेपाळ कनेक्शन आणि परदेशी पैसा
तपासात असे दिसून आले की ,चांगूर बाबाचे नेटवर्क नेपाळपर्यंत पसरलेले होते. त्याला परदेशातून निधी मिळत होता, जो बेकायदेशीर धर्मांतरासाठी वापरला जात होता. एका पीडितेने सांगितले की, पासपोर्ट बनवले जात होते आणि निधीचा व्यवहार नेपाळमधून होत होता. यूपी एटीएसने ३०० कोटी रुपयांचा परदेशी निधीचा खुलासा केला आहे. चांगूर बाबाच्या टोळीने हजारो मुलींना लक्ष्य केले होते. तपासात अनेक संशयास्पद बँक खाती देखील उघडकीस आली आहेत.
पोलिसांवर गंभीर आरोप
पीडितांनी पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले. एका तरुणीने सांगितले की, पोलिस वरपासून खालपर्यंत विकले जातात. बलात्कारासाठी पैसे देण्यात आल्याचा दावा तिने केला. मिठाईच्या डब्यात २२ लाख रुपये सापडले. या रॅकेटविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आवाहन पीडितांनी योगी सरकारला केले. अजूनही अनेक मुलींच्या जीवाला धोका आहे, असंही पिडीत तरुणींनी सांगितलं.
चांगूर बाबाची आलिशान हवेली पाडली
यूपी पोलिसांनी बलरामपूरमधील चांगूर बाबाची आलिशान हवेली पाडली. ही हवेली बेकायदेशीर धर्मांतराचे केंद्र होती. तपासात असे दिसून आले की बाबाने नीतू उर्फ नसरीनच्या नावाने अनेक मालमत्ता खरेदी केल्या होत्या. एटीएस आणि ईडी या नेटवर्कच्या आंतरराष्ट्रीय कनेक्शनची चौकशी करत आहेत. चांगूर बाबा आणि त्याची सहकारी नीतू यांना लखनऊ येथून अटक करण्यात आली आहे.
आम्हाला न्याय हवा आहे – पीडितांचा आक्रोश
पत्रकार परिषदेत औरैया येथील एका पीडितेने सांगितले की तिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. आरोपी मेराज अन्सारीने तिच्या कुटुंबालाही लक्ष्य केले. तिने सांगितले की, चांगूर बाबाने व्हिडिओ कॉलवर तिचे नाव झैनब ठेवले होते. पीडितांनी योगी सरकारकडून संरक्षण आणि न्यायाची मागणी केली. पिडीतांनी सांगितले की या रॅकेटमधील अनेकजण अजूनही मोकाट फिरत आहेत.
या महिला बाबांच्या निशाण्यावर
छांगूर बाबाने आत्तापर्यंत सुमारे 4 हजार लोकांचे धर्मांतर केले आहे, ज्यात 1500 हून अधिक महिलांचा समावेश आहे. गर्भवती राहू न शकणाऱ्या महिला, गरीब, विधवा आणि मानसिकदृष्ट्या आजारी महिला अशी लोकं त्यांच्या निशाण्यावर होती, ज्यांना त्या बाबाने आमिष दाखवून धर्मांतरित केले होते. आंतरराष्ट्रीय धर्मांतर रॅकेट तयार करणे हे बाबाचे उद्दिष्ट होते, ज्यासाठी त्याने भारत-नेपाळ सीमेवर इस्लामिक औषध केंद्र बांधण्याची तयारी सुरू केली होती.