संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडीओ भर न्यायालयात लावले...; पत्नी अन् भावाच्या अश्रूंचा बांध फूटला
ट्रम्प यांचा पुन्हा ‘मीच हिरो’चा डंका; Thailand-Cambodia मध्ये युद्धबंदीचा दावा; पण गोळीबार सुरुच
संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड हाच मुख्य सुत्रधार असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला. तर वाल्मिक कराड यांचा या संतोष देशमुख यांच्या हत्येशी काहीही संबंध नसून त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दाव कराडच्या वकिलांकडून करण्यात आला. तसेच त्यासाठी कराडच्या वतीने जामीन अर्जही दाखल करण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ डिसेंबरला होणार आहे. (Beed crime)
तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या मिहीर शहा निवाड्यानुसार अटकेची कारणे लेखी देणे बंधनकारक असतानाही वाल्मिक कराडला ती देण्यात आलेली नसल्याचा दावा करत, त्याच्यावर मोक्का कायदा चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. देशमुख हत्याकांडाशी कराडचा संबंध नसून, तो घटनेच्या दिवशी शेकडो किलोमीटर दूर असल्याचेही बचाव पक्षाने न्यायालयात मांडले.
VIRAL: ‘सेक्स टॉय ते काँडोम..’ Epstein Files फोटोंनी जगभरात आश्चर्याचा स्फोट
यावर सरकारी पक्षाचे वकील ॲड. अमरजितसिंह गिरासे यांनी प्रत्येक तारखेनुसार घटनाक्रम सविस्तर उलगडत, साक्षीदारांचे जबाब, मोबाईल कॉल डिटेल्स (सीडीआर), सीसीटीव्ही फुटेज, ध्वनिमुद्रण आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल सादर केला. या सर्व पुराव्यांच्या आधारे वाल्मिक कराड हाच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ठाम युक्तिवाद त्यांनी केला.
देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मिक कराड याने आवादा कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा सरकारी वकिलांकडून न्यायालयात करण्यात आला. याशिवाय खंडणीच्या मागणी करत सुदर्शन घुले याने कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. सुदर्शन घुले संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, असेही नमूद करण्यात आले.
Nagpur Crime: उधारीचं बिल मागितल्याचा राग! अडीच मिनिटांत गुंडांनी उर्वशी बार फोडला; CCTVत थरार कैद
सरकारी पक्षानुसार, खंडणीच्या मागणीला अडथळा ठरणाऱ्या संतोष देशमुख यांना “आडवा करा” असा आदेश वाल्मिक कराड याने दिला. त्यानंतर सुदर्शन घुले व त्याच्या सहकाऱ्यांनी उमरी टोलनाक्यावरून देशमुख यांचे अपहरण करून त्यांना निर्जनस्थळी नेऊन नृशंस मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात फोनवर संभाषण सुरू होते. या संपूर्ण घटनेत वाल्मिक कराड हाच मारेकऱ्यांना निर्देश देत असल्याचा ठाम युक्तिवाद सरकारी वकील ॲड. अमरजितसिंह गिरासे यांनी केला.






