माळवाडीत चोरट्यांनी तीन बंगले फोडले (फोटो - istockphoto)
याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मसूर ते शामगाव रस्त्याजवळ माळवाडी ता. कराड गावातील रस्त्यावरील बंद असणारे सलग तीन बंगले चोरट्यांनी लक्ष केले. कडीकोयंडे व कुलपे तोडून घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. तीन बंगल्याच्या मध्यवर्ती लीला संपत जाधव यांचा बंगला आहे. यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाट उचकटून १ तोळे २ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लंपास केली.
लिला जाधव या दोनच दिवसांपुर्वी आजारी असल्याने गोवा या ठिकाणी गेल्या आहेत. चोरट्यांनी विजयकुमार बाबुराव देसाई हे आपल्या लक्ष्मी निवास या बंगल्याला कुलूप लावून काही दिवसांसाठी मुंबईला मुलाकडे गेले आहेत. चोरट्यांनी यांच्या घराला लक्ष करत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटाचे लॉक तोडले व कपडे उचकटले व इतर साहित्य अस्ताव्यस्त फेकले. परंतु चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
हेही वाचा: Crime: चालकाने चोरले मालकाच्या पत्नीचे 10 तोळ्यांचे दागिने; शिरूरमधील घटना, गुन्हा दाखल
त्यानंतर माजी उपसरपंच प्रमिला मधुकर घाडगे यांच्या मधुप्रेम या बंगल्याकडे आपला मोर्चा वळवला. दाराला लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाट उचकटले. मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. सदर चोरीच्या प्रकाराची फिर्याद लीला जाधव यांची मुलगी सौ सुजाता विक्रमसिंह पोळ रा. यशवंतनगर – उत्तर कोपर्डे यांनी मसूर पोलिसात दिली. पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मसूर पोलीस ठाण्याचे सपोनि आदिनाथ खरात करीत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने भेट देऊन चोरीच्या प्रकाराची पाहणी केली. पोलिसांनी ठसे तज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले होते.
चालकाने चोरले मालकाच्या पत्नीचे 10 तोळ्यांचे दागिने
शिरुर बाजार समितीचे माजी उपसभापती तसेच राष्ट्रवादीचे नेते मानसिंग पाचुंदकर यांच्या एका वाहनावर नितीन मिटकरी चालक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान पाचुंदकर यांच्या पत्नी ज्योती या काही कामाच्या निमित्ताने त्यांच्या कारमधून गेलेल्या असताना त्यांनी त्याचे दहा तोळे वजनाचे सोन्याचे गंठण पर्समध्ये ठेवून पर्स कार मध्ये ठेवली. त्यावेळी चालक कारमध्येच होता. काम आटोपून ज्योती पाचुंदकर पुन्हा कारमध्ये बसून घरी आल्यानंतर त्यांनी पर्सची पाहणी केली असता पर्समध्ये दागिने नसल्याचे निदर्शनास आले. नसल्याने चालकाने दागिने चोरी केल्याबाबतचा अंदाज पाचुंदकर यांनी वर्तविला.