File Photo : Crime
विरली : ग्रामपंचायतीमधील प्रलंबित कामे आटोपून कार्यालयीन कामकाजासाठी मुख्यालयी जात असलेल्या ग्रामसेवकाला ग्रामपंचायत सदस्याने रस्त्यात अडवून अश्लील शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर त्याला जिवे मारण्याची धमकी दिली गेली. ही घटना विरली-खुर्द येथे सोमवारी (दि. 20) दुपारी एकच्या सुमारास घडली.
हेदेखील वाचा : विद्यार्थिनीला स्वत:च्या केबिनमध्ये बोलवायचा अन् जवळीक साधून..; क्रीडा शिक्षकाचे घृणास्पद कृत्य
ग्रामसेवक संजय गहाने यांच्या फिर्यादीवरून लोकेश एकनाथ भेंडारकर (रा.विरली-बूज) याच्याविरोधात लाखांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ग्रामसेवक संवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संजय गहाने हे विरली-बूज ग्रामपंचायतीत ग्रामसेवक असून, त्याच लोकेश भेंडारकर हा ग्रामपंचायत सदस्य आहे. यापूर्वी या ग्रामसेवकाकडे नजीकच्या विरली/खुर्द ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार होता. काही दिवसापूर्वी पंचायत समिती प्रशासनाने विरली/खुर्द येथील कार्यभार काढून आथली ग्रामपंचायतीचा कार्यभार देण्यात आला आहे.
सोमवारी, ग्रामसेवक संजय गहाने हे विरली/खुर्द ग्रामपंचायतीमधील प्रलंबित कामे आटोपून मुख्यालय विरली/बूज कडे येण्यासाठी निघाले असता दुपारी एकच्या सुमारास विरली/खुर्द ते विरली/बूज मार्गावर ग्रामपंचायत सदस्य लोकेश भेंडारकर याने ग्रामसेवकास रस्त्यात अडवून अश्लील शिवीगाळ करत ‘तू जर मी सांगितलेले काम केले नाही तर तुला जीवनीशी मारून टाकीन’ अशी धमकी दिली.
दरम्यान, लाखांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलिस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे करत आहेत. या घटनेने ग्रामसेवक संवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यात वाढताहेत गुन्हेगारीच्या घटना
पुण्यातील गुन्हेगारी कमी होत नसताना नव्याने गुन्हेगारीचे केंद्र बनलेल्या बिबवेवाडीत ‘बार वाल्यां’ची गुंडागर्दीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. बिलावरून ३ तरुणांना कामगार व गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या तरुणांनी प्रचंड मारहाण केली. धक्कादायक म्हणजे, बारच्या कामगारांसोबत बाहेरच्या मुलांना बोलवून मारहाण का केली गेली असा प्रश्न उपस्थित होत आहे. मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून, तो पाहून सर्वसामान्याचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही.
हेदेखील वाचा : १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी चलपती कोण होता? पत्नीसोबतच्या सेल्फीमुळे तो रडारवर कसा आला?