शिरुरमध्ये झोपलेल्या कुटुंबाला सत्तूरच्या धाकाने लुटले (File Photo : Crime)
जालना : जालन्यात एका तरुणाला गरम तापलेल्या लोखंडी रॉडने निर्वस्त्र करून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालन्यातील भोकरदन तालुक्यातील अन्वा येथे ही घटना घडली. याप्रकरणी दोन जणांविरोधात पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणाचा तपास पारध पोलिस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील अन्वा येथे एका 36 वर्षीय व्यक्तीला चुलीमध्ये तापलेल्या गरम लोखंडी रॉडने अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली. कैलास बोराडे असे या मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेतीवरून झालेल्या जुन्या वादातून ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतीच्या प्रकरणावरून वाद
नवनाथ दौंड आणि सोनू उर्फ भागवत दौंड अशी संशयित आरोपींची नावे आहेत. कैलास बोराडे आणि नवनाथ दौंड यांचा मागील काही दिवसांपूर्वी शेतीच्या प्रकरणावरून वाद झाला होता. त्यामुळे नवनाथ दौंड याच्या सांगण्यावरून सोनू उर्फ भागवत दौंड याने त्यांना अमानुष मारहाण केली. याप्रकरणी त्यांनी जालन्यातील पारध पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली.
लोखंडी रॉडने मारहाण
कैलास बोराडे या व्यक्तीला तापलेल्या गरम लोखंडी रॉडने अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली. शेतीवरून झालेल्या जुन्या वादातून ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मालेगावातही मारहाण
काही दिवसांपूर्वीच, मालेगाव तालुक्यातील चिवरा शेतशिवारात शेतीच्या वादातून महिलेला मारहाण करण्यात आली. यामध्ये चंद्रप्रभा मुरलीधर लोखंडे (रा. वसमत, जि. हिंगोली) यांना त्यांच्या आईच्या शेतात गेल्यामुळे वाशिम येथील सात ते आठ जणांनी लोखंडी विळा व पाईपने मारून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.