सातारा : साताऱ्यात (Satara Crime News) एका दहा महिन्याच्या निरागस चिमुरड्याची त्याचाच काकाने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रागाच्या भरात काकाने आपल्याचं पुतण्याला विहिरीत ढकलून त्याचा जीव घेतला.अक्षय मारुती सोनावणे असं या सनकी काकाचं नाव आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[read_also content=”अरे बापरे ! बॅलेन्सियागाच्या कचऱ्याच्या बॅगची किंमत ऐकाल तर बसेल धक्का https://www.navarashtra.com/india/balenciaga-launched-new-trash-bag-1-lakh-40-thousand-rupees-nrsr-312655.html”]
आधी त्याने त्या चिमुकल्याला चॅाकलेटचं आमिष दिलं आणि त्याला घराबाहेर बोलावलं. तो जवळ येताच त्याला विहिरित ढकललं. या घटनेनंतर कुटुंबियानी स्थानिकांच्या मदतीने चिमुरड्याचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली असून, दहा महिन्यांच्या मुलाचा जीव गेल्याचं कळल्यानंतर त्याच्या नातलगांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, घरगुती वादाचा राग मनात धरून काकाने पुतण्याचा जीव घेतल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून आरोपीलाही पोलिसांनी (Satara Police) ताब्यात घेतलं आहे. सध्या सातारा शहर पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
[read_also content=”उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं मतदान https://www.navarashtra.com/india/vice-presidential-election-begins-pm-narendra-modi-casts-his-vote-nrps-312629.html”]
चॉकलेटचं आमीष
घरगुती वादाचा राग मनात धरुन अक्षयने त्याच्या चिमुकल्या पुतण्याला चॉकलेटचं आमीष दाखवलं. मुलाला घराबाहेर बोलवलं आणि विहिरीत टाकून दिलं, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेत निष्पाप चिमुरड्याचा जीव गेलाय. दहा महिन्यांच्या मुलाचा जीव गेल्याचं कळल्यानंतर त्याच्या नातलगांनी एकच आक्रोश केलाय. स्थानिकांनी मदतीने पोलिसांनी या मुलाचा मृतदेह बाहेर काढला असून पोलिसांनी तो पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवलाय. या घटनेनं सातारा शहरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय.