काय घडलं नेमकं?
आंबेनळी घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. बुधवारी सकाळी दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परिसरात तीव्र दुर्गंधी जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी रस्त्यालगत असलेल्या मोरीत डोकावून पहिले असता त्यांना एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. पोलिसांनी तात्काळ पोलादपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. तपासणीसाठी फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थकी दाखल झाली. हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मोरीत टाकण्यात आल्याची शक्यता प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिचे वय अंदाजे ३० ते ४० वर्ष असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसात बेपत्ता झालेल्या महिलांच्या तक्रारींचा आढावा घेतला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. पोलीस सर्वच दृष्टिकोनातून तपास करत आहे. नागरिकांनी परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी तसेच या घटनेचा लवकरात लवकर छडा लावावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
बारावीच्या विद्यार्थिनीचं गुंगीचं औषध देऊन अपहरण; शुद्धीवर आली तेव्हा पुणेत
सातारा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीची परीक्षा देणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन अपहरण केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगी एक्सट्रा क्लाससाठी जात होती तेव्हा हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वाराकडून तिने लिफ्ट घेतली. त्यांनतर ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यांनतर ती पुण्यात असल्याचे लक्षात आले. तिने स्थानिकाच्या मोबाईलवरून कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यांनतर ती सुखरूप घरी परतली.
Ans: आंबेनळी घाटातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या मोरीत मृतदेह आढळला.
Ans: नाही, अद्याप ओळख पटलेली नाही; वय अंदाजे 30–40 वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Ans: हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा संशय लक्षात घेऊन सीसीटीव्ही, मोबाइल लोकेशन आणि तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत.






