युपीच्या (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) दोन महिलांनी (Two Womens) एकमेकांच्या पतीवर (Each Other Husband) बलात्काराचा आरोप (Allegation Of Rape) केला आहे. दोन्ही महिला शेजारी असून एकाच जातीच्या आहेत. दोघींचेही पती दुधाचा व्यवसाय करतात. पोलिसांनी दोन्ही प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल केला असून पहिल्या गुन्ह्यात आरोपींना अटकही केली आहे.
सचेंडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेने १८ फेब्रुवारी रोजी शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीवर बलात्काराचा आरोप करत पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती. पोलीस महिलेची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई करत होते, त्यानंतर ४८ तासांनंतर आरोपीची पत्नी पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेच्या पतीवर आरोप करत कारवाईची मागणी केली.
[read_also content=”आता रंगणार नवा कलगी तुरा, उबाठा विरुद्ध शिंदे गट येणार आमने-सामने,’या’ वादाला फुटणार तोंड; मुंबई महापालिकेत राडा होण्याची शक्यता? https://www.navarashtra.com/maharashtra/shinde-vs-ubt-now-second-innings-begins-uddhav-balasaheb-thackeray-and-shinde-camp-will-face-each-other-chances-of-rada-in-the-bmc-nrvb-371008.html”]
ती म्हणाले, एफआयआर लिहिली नाही तर पेटवून घेईन. यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला. पोलिसांनी पहिल्या गुन्ह्यात आरोपीला अटक केली आहे. दोन्ही महिला एकाच गावातील आणि जातीच्या आहेत. दोघीही शेजारी राहतात आणि दोघींचेही पती दुधाचा व्यवसाय करतात.
या संपूर्ण प्रकरणात एसीपी पंकी निशांत शर्मा सांगतात की, १८ तारखेला सचेंडीमध्ये एका महिलेने शेजाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला. आज आरोपीच्या पत्नीने पीडितेच्या पतीवर बलात्कार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस दोन्ही कुटुंबातील जुने भांडण विचारात घेत असले तरी हे प्रकरण बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचे असेल तर ते गांभीर्याने या तपासात गुंतले आहेत.
[read_also content=”आता साहिल उघड करणार सत्य? निक्कीशी लग्न लावणाऱ्या ब्राम्हणाला पोलिस कोठडीत करावा लागणार सवाल-जवाबाचा सामना https://www.navarashtra.com/crime/nikki-yadav-murder-case-update-sahil-gehlot-will-be-made-face-to-face-with-pandit-who-process-the-vidhis-of-merriage-nrvb-370990.html”]