पुण्यात महिला पोलिस अधिकाऱ्याला धमकी (फोटो- सोशल मीडिया)
पुणे/Crime News: रात्रगस्ती कर्तव्यावर असलेल्या चंदनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ महिला पोलिस निरीक्षकाला अंडाभुर्जीची गाडी चालविणार्या दोघांनी पाहून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर कारवाईसाठी ताब्यात घेणाऱ््या पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ््यांना तुम्हाला घरी बसवतो, तुमची नोकरी घालवतो असे देखील धमकावले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलिस अधिकारी ढाकणे या चंदनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नेमणूकीस आहेत. शुक्रवारी रात्री त्या सेक्टर राऊंड कर्तव्यावर होत्या. त्यावेळी त्यांना खराडी बायपासच्या कॉर्नरला आरोपी योगेश आणि महेश या दोघांची अंडाभुर्जीची गाडी रात्री उशीरापर्यंत चालू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
ढाकणे यांनी दोघांना हातगाडी बंद करून घेण्यास सांगितले. त्यावेळी आरोपींनी उर्मटपणे बोलत करतो की मग काय करणार बघून घेईल तुम्हाला असे म्हणत फिर्यादींची वर्दी पकडून, त्या करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. दरम्यान,दोघा आरोपींना विमानतळ पोलिसांनी कारवाई करण्यासाठी ताब्यात घेतले असता, पोलिस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ््यांना तुम्हाला बुघून घेतो. तुम्हाला घरी बसवतो, तुमची नोकरी घालवतो असे धमकावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बरूरे करीत आहेत.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणावर खुनी हल्ला
पुण्यातील उत्तमनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या मुलांना भेटण्यास नकार दिल्याच्या कारणातून, त्यांनी पोलिस भरतीची तयारी करणार्या एका तरुणावर धारधार शस्त्राने खूनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणावर खुनी हल्ला, डोक्यात सपासप वार; कारण…
प्रथमेश चिंटू आढळ (वय. 19,रा. कोंढवे धावडे) असे जखमी तरुणाचे नाव असून, सद्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरूवारी (दि. 11) रात्री आठ वाजताच्या सुमारास आर. आर. वाईन्स जवळ उत्तमनगर परिसरात घडली आहे. यावेळी टोळक्याने तीक्ष्ण शस्त्रे उगारून परिसरात दहशत माजविली. याप्रकरणी, उत्तमनगर पोलिसांनी करणसिंह सुरेंद्रसिंह गचंड (वय. 20,रा. आरती निवास, मनिषा थेटर जवळ उत्तमगर) याला अटक केली असून, त्याच्यासोबतच्या तिघा अल्पवयीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.