काय घडलं नेमकं?
काजल गजानन रोकडे (वय १७) ही सोशल मीडियावर रिल्स बनवत होती. तिचा मोठा चाहता वर्ग होता. काजल मंगळवारी वर्धा येथील घरून बाहेर पडली होती. ती घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोध सुरु केला आहे. मोबाईलचे लोकेशन तपासल्यावर ते सेलू तालुक्यातील रिधोरा येथील पंचधारा जलाशय परिसर दाखवत होते. कुटुंबीयांनी रिधोरा येथे येऊन पाहणी केली असता जलाशयाजवळ तिची पांढऱ्या रंगाची मोपेड, चपला, पर्स आणि मोबाईल आढळून आले. परिसरात शोध घेऊनही ती सापडली नाही. याबाबत कुटुंबीयांनी सेलू पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांना माहिती मिळताच सेलू पोलीस ठाण्याचे देवेंद्र ठाकूर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. बोटीच्या सहाय्याने जलाशयात शोधमोहीम राबविण्यात आली. त्यावेळी बुधवारी दुपारी सुमारे २.४५ वाजताच्या सुमारास युवतीचा मृतदेह पाण्यात आढळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला असून उत्तरीय तपासणीसाठी सेलू ग्रामीण रुग्णलयात पाठविण्यात आला आहे. काजलने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. पोलीस या प्रकरणाचा तपस करत आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्याकडून ५ वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटोही पाठवले
वर्धा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याने एका मुलीवर ५ वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील राष्ट्रवादीच्या नेत्याचे नाव दिवाकर गमे असा आहे. तो राजकीय वर्तुळातील बड्या नेत्यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. पीडित मुलीला नौकरीचा आमिष दाखवून हा संतापजनक प्रकार केल्याचे समोर आले आहे.या घटनेने वर्धा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Beed Crime: तीन मुली झाल्याने छळ, दुसऱ्या लग्नाचा दबाव; 24 वर्षीय विवाहितेची आत्महत्या
Ans: ही घटना वर्धा जिल्ह्यातील पंचधारा जलाशय येथे घडली.
Ans: काजल गजानन रोकडे (वय 17) असे तिचे नाव आहे.
Ans: काजल घरातून बाहेर पडली होती, पण परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. मोबाईल लोकेशन जलाशय परिसरात आढळले.






