Photo Credit- Social Media बाबा सिद्धीकींनी डायरीत उल्लेख केलेला मोहित कंबोज कोण?
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी बिल्डर कनेक्शनची चौकशी न करण्याबद्दल झीशान सिद्दीकी यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांच्या निवेदनात त्यांनी 10 बिल्डर आणि दोन राजकारण्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे यात ज्या दोन राजकाण्याची नावे घेण्यात आली आहेत, त्यात भाजपचे मोहित कंबोज यांच्याही नावाचा समावेश आहे.
हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान व्हॉट्स ॲपवरुन त्यांचं मोहित कंबोज यांच्याशी बोलणं झालं होतं. एका बिल्डरच्या पाठपुराव्यासाठी मोहित कंबोज यांना बाबा सिद्दीकी यांना भेटायचं होतं, असा मोठा झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी त्याच्या वडिलांनी त्याच्या वैयक्तिक डायरीत मोहित कंबोजचा उल्लेख केला होता आणि त्याच दिवशी त्याच्या वडिलांची हत्या झाली. असं झीशान सिद्धिकी यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. विरोधी पक्षही भाजपवर हल्ला करत आहेत. त्यामुळे आता मोहित कंबोज कोण आहेत, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
विशेष म्हणजे मोहित कंबोज हे एक व्यापारी असून राजकारणाशी देखील संबंधित आहेत. 2013 मध्ये त्यांना भाजपच्या मुंबई युवा युनिटचे अध्यक्ष बनवण्यात आले. यानंतर त्यांनी महाराष्ट्रात पक्षाच्या विस्तारासाठी काम करण्यास सुरुवात केली. ग्लोबल युथ मार्केटिंग फोरमने त्यांना 100 सर्वात प्रभावशाली तरुण नेत्यांपैकी एक म्हणून देखील स्थान दिले.
मोहित कंबोज हे वाराणसीतील एका व्यावसायिक कुटुंबातील आहेत. त्यांनी 2012 ते 2019 पर्यंत इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या कुटुंबाचा दागिन्यांचा व्यवसाय होता. त्यांनी पुढे उद्योजक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यांच्या वडिलांचा वारसा पुढे नेला. 2005 मध्ये ते उत्तर प्रदेशहून मुंबईत स्थलांतरित झाले. त्यांनी मुंबईतील एका महाविद्यालयातून वाणिज्य आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी केबीजे नावाचा त्याचा ग्रुप सुरू केला. ते या ग्रुपचे सीईओ आहेत. मोहित कंबोज यांचे नाव वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2022 मध्येही एका बँक फसवणुकीच्या प्रकरणात त्यांचे नाव आले होते आणि त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यामुळे भाजपला बरीच टीका सहन करावी लागली.
Pimpri-Chinchwad : अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी गुन्हे शाखेची मोठी कारवाई
माजी आमदार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये झिशान सिद्दीकी यांनी आपला जबाब नोंदवला आहे. यामध्ये त्यांनी लॉरेन्स गॅंगचा कोणताही उल्लेख केलेला नाही. याउलट त्यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख केला. हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान व्हॉट्स ॲपवरुन त्यांचं मोहित कंबोज यांच्याशी बोलणं झालं होतं. एका बिल्डरच्या पाठपुराव्यासाठी मोहित कंबोज यांना बाबा सिद्दीकी यांना भेटायचं होतं, असा मोठा झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. मोहित कंबोज यांचे नाव समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.