डोंबिवली : डोंबिवली येथून एक चोरीची घटना समोर आली आहे. तुमच्या घरात वापरून झालेले कपडे आहेत का. ते आम्हाला गरीब गरजू लोकांना द्यायचे आहेत, असे म्हणत एका महिलेचे तीन लाख ६० हजार रुपयांचे दागिने लुटले. घरात जुने कपडे नाहीत असे सांगूनही जुने कपडे घ्यायला आलेली महिला हटत नव्हती. याकाळात महिलेने घरातील महिलेला भुरळ घालून, बोलण्यात गुंतवून तिच्या जवळील तीन लाख ६० हजार रुपयांचे दागिने लुटून नेले. या प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
घरफोड्या करणाऱ्याला चोरट्याला ठोकल्या बेड्या; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर
नेमकं काय घडलं?
तक्रारदार सायली सावंत यांनी मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हंटले आहे, की बुधवारी दुपारच्या वेळेत कार्यालयातून मी घरी आले होते. दरम्यान या काळात घरात असतानां अचानक एक महिला घराच्या दरवाज्यात आली आणि तिने आपण गरजू गरिबांसाठी जुने कपडे घेतो असे सावंत यांना सांगितले. पण घरात जुने कपडे नाहीत. जेव्हा कधी असतील तेव्हा नक्कीच देईन असे सायली सावंत यांनी दारात आलेल्या महिलेला सांगितले. महिला काहीतरी करून घरातील जुने कपडे द्याच असा आग्रह करून दरवाजा समोरून जाण्यास तयार नव्हती. घरात जुने कपडे नाहीत सायली सावंत दरातील महिलेला सांगत होत्या. याच काळात दारात जुने कपडे घेण्यासाठी आलेल्या महिलेने सायली सावंत यांना भुरळ घालून त्यांना संमोहित केले आणि बोलत असतांना त्यांच्या गळ्यातील सोन्याचा एकूण तीन लाख ६० हजार रूपयांचा ऐवज काढून पलायन केले.
काही वेळानेभानावर आल्यावर सायली यांना आपल्या जवळील सोन्याचा ऐवज गायब असल्याचे आढळले. घरात आले तेव्हा सर्व दागिने अंगावर असताना अचानक दागिने गायब झाले कसे, असा प्रश्न त्यांना पडला. दारात जुने कपडे घेण्यासाठी आलेल्या महिलेने आपणास भुरळ घालून आपल्या जवळील सोन्याचे दागिने फसवणूक करून नेल्याचा संशय व्यक्त करून सायली सावंत यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ पाऊलबुध्दे याप्रकरणाचा तपास करत आहेत.
साधूच्या वेशात आले, हाताला रक्षा बांधली आणि…; तब्बल २० हजार रुपयांचा ऐवज केला लंपास, नाशिकमधील घटना
नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साधूंच्या वेशात तीन भामटे आले आणि दीक्षा देण्याच्या बहाण्याने एका महिलेला भुरळ घालून तब्बल २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रॉड परिसरातील पाटील पार्कमधील श्रीकृष्ण मंदिराच्या मागील गल्लीत घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात; भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तरुण अडकला अन्…