निवडणुकीत महिला मतदारांचं राज! अरविंद केजरीवाल यांच्याकडूनही महिलांसाठी मोठी घोषणा
देशात सध्या निवडणुकीत महिला मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र, झारखंडनंतर दिल्लीच्या निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती झाली आहे. दिल्ली सरकारने गुरुवारी महिला सन्मान योजना लागू केली असून या योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांना १ हजार रुपये मिळणार आहेत. तर सत्ता आली तर २१०० देण्याची घोषणा केली आहे. १८-६० वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
आज हमारी सरकार ने दिल्ली की हर महिला को हज़ार रुपए देने की योजना शुरु कर दी है।
चुनाव के बाद हम दिल्ली की हमारी सभी माताओं-बहनों को हर महीने 2100 रुपए उनके अकाउंट में देंगे। https://t.co/1KX72pLNDC pic.twitter.com/kOb4mwJngd
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 12, 2024
यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, “आज दिल्लीच्या जनतेसाठी दोन मोठ्या घोषणा करण्यासाठी मी इथे आलो आहे. या दोन्ही घोषणा दिल्लीतील महिलांसाठी आहेत. मी आश्वासन दिलं होतं की प्रत्येक महिलांच्या खात्यात हजार रुपये जमा करणार आणि आज सकाळी मंत्रिमंडळात दोन्ही प्रस्ताव पास झाले आहेत. याबरोबरच ही योजना दिल्लीमध्ये लागू झाली आहे. ज्या महिलांनी यासाठी अर्ज केला आहे, त्यांच्या बॅंक खात्यात रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पैसे जमा केले जातील.
“मी मार्चमध्ये या योजनेची घोषणा केली होती, त्यावेळी एप्रिलमध्ये ही योजना लागू होईल असी अपेक्षा होती, पण त्यावेळी मला तुरुंगात पाठवण्यात आलं. त्यानंतर मी आतिशी यांच्यासोबत पुन्हा ही योजना लागू करण्यासाठी प्रयत्न केला आणि आता ही योजना कार्यान्वित होत आहे. हे काही महिलांवर उपकार नाहीत. महिलाच मुलांना वाढवतात, त्याचं भविष्य निर्माण करतात, म्हणून काही तरी त्यांना मदत करावी, अशी आमची अपेक्षा आहे.
माझं असं मानणं आहे की यामुळे दिल्ली सरकारच्या खर्चावर कुठेही भार पडणार नाही. काही लोक विचार करत होते, पण जे अरविंद केजरीवाल जे ठरवतो, ते करतो. भाजपचे लोक आरोप करत आहेत की हे मोफत सुविधा आणि ‘फ्री रेवडी’ वाटत आहेत. ते म्हणतात की पैसा कुठून येईल. जेव्हा मी पहिली निवडणूक जिंकलो आणि म्हणालो की वीज आणि पाणी मोफत देणार, त्यावेळीही त्यांनी मी खोट बोलत असल्याचा आरोप केला होता.
निवडणुकीनंतर तुमच्या खात्यात २१०० रुपये येतील. “मी जादूगार आहे, हे दाखवून देईन. लवकरच निवडणुका येत आहेत. योजना लागू झाली आहे. सध्या पैसे खात्यात जात नाही. पुढील २-३ दिवसांत आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते तुमच्या गल्लीत येऊन रजिस्ट्रेशन करतील. रजिस्ट्रेशन कार्ड चांगले ठेवा, कारण निवडणुकीनंतर तुमच्या खात्यात २१०० रुपये येतील. जसे १००० रुपये आता दिले जाणार आहेत, तसेच निवडणुकीनंतरही २१०० जमा केले जातील. असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.