फोटो सौजन्य- Air Pollution
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात राजधानी दिल्लीत धुक्याचे दाट सावट पाहिला होते. असे असताना आता याच ठिकाणी वायू प्रदूषणातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दिल्लीतील प्रदूषणाबाबत दरवर्षी योजना तयार केल्या जातात. प्रदूषण नियंत्रणासाठी मोठमोठ्या घोषणाही केल्या जातात. मात्र, त्या सर्व फोल ठरत आहेत. नोव्हेंबर महिना आला की दिल्लीत प्रदूषणात कमालीची वाढ होताना दिसते.
हेदेखील वाचा : शिवतीर्थावर मनसेची 17 तारखेला सभा होणार की नाही? मुंबईत राज ठाकरेंकडून मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध
राजधानी दिल्लीत प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली Grape-1, Grape-2, Grape-3 आणि Grape-4 नंतर राबवले जातात. पण दिलासा दिला जात नाही. चार महिने आकाशात फक्त धुके दिसत आहे. केवळ दिल्लीच नाही तर उत्तर प्रदेश आणि पंजाबसह उत्तर भारतातील बहुतांश भागात सकाळी सर्वात दाट धुके दिसून आले. धुक्यामुळे दृश्यमानता खूपच कमी झाली. याचा फटका रेल्वेसह विमानसेवेलाही बसल्याचे पाहिला मिळाले.
दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून दाट धुके दिसून येत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने AQI 400 पार केल्यानंतर Grape-3 लागू केले आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या आतिशी सरकारनेही मोठे पाऊल उचलले आहे. दिल्लीतील सर्व शाळांमधील प्राथमिक (इयत्ता 5 वीपर्यंत) वर्ग बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, ‘प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे पुढील सूचना मिळेपर्यंत दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळांमध्ये ऑनलाईन वर्ग घेण्यात येतील. एनसीआरमध्ये सध्या आकाशात धुक्याची चादर आहे. पहाटे रस्त्यांवर शून्य दृश्यमानतेची नोंद होत असल्याने वाहतूकही मंदावली आहे. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
धुक्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
दरम्यान, ‘हे धुके लोकांसाठी त्रासाचे कारण बनले आहे. एकीकडे लोक खोकला, डोळ्यांची जळजळ यांसारख्या समस्यांनी हैराण झाले आहेत, तर दुसरीकडे प्रदूषणापासून दिलासा मिळण्याची आशा फारशी दिसत नाही. आता दिल्ली-एनसीआरमध्ये ग्रेप-3 लागू करण्यात आला आहे. ग्रेप-3 मुळे किती दिलासा मिळतो हे पाहणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
ग्रेप 3 च्या अंमलबजावणीमुळे काय होतात बदल?
ग्रेप-3 लागू झाल्यानंतर, आंतरराज्यीय बस, इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहने, बीएस-6 डिझेल बस आणि इतर वाहने वगळता दिल्ली-एनसीआर राज्यातील सर्व वाहनांना दिल्लीत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच नवीन इमारती बांधण्यास आणि पाडण्यास बंदी घालण्यात आली आहे. आता दिल्लीतील प्रमुख रस्त्यांवर दररोज पाणी शिंपडले जाईल, जेणेकरून प्रदूषण कमी करता येईल. ग्रेप-3 लागू झाल्यानंतर, दिल्ली आणि गुरुग्राम, फरिदाबाद, गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात बीएस-3 पेट्रोल आणि बीएस-4 डिझेल वाहने चालवण्यावर बंदी असेल.
हेदेखील वाचा : ‘जनतेच्या पुण्याईवर अभिजीत पाटील विजय होतील’; खासदार ओमराजे निंबाळकर यांचं विधान